ठाणे : मुंब्र्यात वीज चोरी केल्याप्रकरणी तन्वीर चौगुले याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने वीज देयकाची रकम भरली नव्हती आणि तो चोरून वीज वापरत होता, अशी बाब तपासात पुढे आली आहे. न्यायालयाने त्याला १ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मुंब्रा येथील कौसा भागातील डोंगरे नगर परिसरात तन्वीर चौगुले हा राहतो. त्याने महावितरणच्या काळापासून वीज देयकाचा भऱणा केलेला नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वीज देयक थकबाकीमुळे त्याचा वीज मीटर टोरंट पॉवर कंपनीने ऑगस्ट २०२१ मध्ये काढला होता. त्यानंतरही त्याने वीज देयकाची रकम भरली नव्हती आणि तो चोरून वीज वापरत होता. त्याच्या दोन सदनिकांचे वीज देयक २ लाख ९६ हजार रुपये इतके आहे. तसेच टोरंट पॉवर कंपनीने त्यांच्या वीज चोरीचे मूल्यांकन केले. त्यावेळेस ही रक्कम ५ लाख १ हजार इतकी झाल्याचे समोर आले होते. वारंवार सूचना देऊनही वीज चोरी करणे त्याने थांबवले नव्हते. अखेर त्याच्यावर  वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये  कारवाई करण्यात आली. त्याच्यावर वीज चोरी कायद्याने गुन्हा करण्यात आला आहे. वीज चोरांविरोधात टोरंट कंपनीने कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.