ठाणे : घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागात एका कारची विद्युत खांबाला धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. पद्म मेघानी (२५) असे मृताचे नाव आहे. तर सौमित्र धारा हे या घटनेत जखमी आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची हत्या
हेही वाचा – ठाणे : दुचाकी आणि सोनसाखळी चोर अटकेत
घोडबंदर मार्गाहून ठाण्याच्या दिशेने पद्म आणि सौमित्र हे कारने येत होते. त्यांची कार चितळसर मानपाडा येथील सेंट झेवियर्स शाळेजवळ आली असता एका विद्युत खांबाला कारची धडक बसली. यात पद्म यांचा मृत्यू झाला आहे, तर सौमित्र यांच्यावर उपचार सुरू आहेत.