ठाण्यातील पाचपखाडी भागातील एका चाळीची संरक्षक भिंत पडून एकजण जखमी झाला आहे. या घटनेत एका कारचेही नुकसान झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भगवान मस्के (५२ वर्ष) असे जखमीचे नाव असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. तर विलास नारायण मस्के यांच्या कारचे नुकसान झाले आहे. पाचपखाडी येथील सेवा रस्ता परिसरातील पारेख गॅरेजच्या मागे अहिरे चाळीची संरक्षक भिंत आहे. ३० फूट लांबी व ५ फूट उंची ही भिंत आहे.

मंगळवारी मध्यरात्री ही भिंत पडून ही दुर्घटना घडली. उर्वरित भिंतीचा भाग धोकादायक स्थितीमध्ये आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, उथळसर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता व अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. पडलेला भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One injured as protective wall collapses in thane msr