ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. दोन गटांमध्ये संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घंटाळे परिसरात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. हा दोन गटांमधील वाद असण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजत आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, त्याच्यासोबत त्याचे सहकारीदेखील होते. आपल्या कार्यालयातून ते रात्रीच्या वेळी ते कंदील पुरवण्याचं काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोर तिथे पोहोचले आणि गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

thane tripartite metro project loksatta news
ठाणे अंतर्गत मेट्रोच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारास मान्यता; केंद्र, राज्य शासन आणि महामेट्रो यांच्यात होणार करार
thane palghar gold chain snatcher loksatta news
ठाणे, पालघरमध्ये सोनसाखळ्या चोरणारे गुजरातचे दोन सराईत चोरटे…
thane municipal corporation property tax
ठाण्यात कर थकबाकीदारांवर कारवाईची चिन्हे, ठाणे महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश
dombivli donkey parking
डोंबिवलीत सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर वाहने उभे करणाऱ्यांना गाढवाची उपमा, टाटा लाईनखाली दुचाकी वाहनांचे बेशिस्त वाहनतळ
Eight minor girls escape from Ulhasnagar government observation home
उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षणगृहातील आठ अल्पवयीन मुली पळाल्या
kalyan Dombivli police
कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत
A fire broke out on Shilpata road.
शिळफाटा रस्त्यावर नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसला आग, वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे २२ प्रवासी सुरक्षित, बस खाक
Thane Municipal Administration taking strict action for air pollution
हवा प्रदुषण रोखण्यासाठी पाहाणीबरोबरच दंडात्मक कारवाई, नोटीसीनंतर नियमांचे पालन होते की नाही, याची पाहाणी सुरू
Kalyan elder brother killed younger brother dispute
कल्याणमध्ये ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

घंटाळी परिसर हा नौपाडा या मध्यवर्ती भागामधील गजबजलेल्या भागांपैकी एक आहे. याच रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर राम मारुती रोड आहे. या भागामध्ये सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. घंटाळी मंदिराच्या मागील बाजूस शाळा असून काही अंतरावरच नौपाडा पोलीस स्थानक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.

Story img Loader