लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागात चोरीच्या संशयातून एकाची चार सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी बनाव रचला होता.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Police raid unauthorized bar in Ghatkopar and rescue eight bar girls Mumbai news
घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका

राजेश यादव (३०), प्रमोद कुमार यादव (२५), गंगाराम यादव (४१) आणि प्रकाश मोहीते (५०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रथमेश चव्हाण (२६) असे मृताचे नाव आहे. मानपाडा येथील भवानी नगर परिसरातील इमारतीच्या २३ व्या मजल्यावरील सदनिकेत रविवारी एकजण जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली होती. त्यानुसार, चितळसर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या व्यक्तीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आणखी वाचा-एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर

दरम्यान, याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू झाला. मृताच्या शरिरावर दोरीने बांधलेल्या आणि मारहाणीच्या जखमा आढळून आल्या होत्या. मृताचे नाव प्रथमेश चव्हाण असून तो मानपाडा भागात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणाची सखोल चौकशी केली असता, राजेश, प्रमोद, गंगाराम आणि प्रकाश या चौघा सुरक्षा रक्षकांनी त्यांना चोरीच्या संशयातून बेदम मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. तसेच पोलिसांची तपासात दिशाभूल करण्यासाठी प्रकाश याने स्वत: पोलिसांना संपर्क साधून व्यक्ती जखमी असल्याची माहिती दिली होती. हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.