ठाणे : मुंबई-गोवा महामार्गावरील नऊ मीटरची एक मार्गिका गणेशोत्सवापुर्वी वाहतूकीसाठी खुली होईल आणि दुसरी मार्गिका डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पुर्ण करून वाहतूकीसाठी खुली केली जाईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. या रस्त्यावरील यंत्रणेला काम करताना त्रास होऊ नये म्हणून आंदोलन करू नये, अशी विनंतीही त्यांनी मनसेला यावेळी केली.
हेही वाचा >>> कल्याण : “देवेंद्र फडणवीसांकडून गृह खात्याचा…”, सुषमा अंधारे यांची टीका
ठाणे येथील तीन हात नाका भागातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत माहिती दिली. गेल्या १२ वर्षांपासून सुरु असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनंत अडचणी आल्या. वनखात्याची परवानगी, कोर्ट कचेरी, दावे या सर्व गोष्टींना आता पुर्ण विराम मिळाला असून या कामाला आता गती आली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई-गोवा महामार्गावरील नऊ मीटरची एक मार्गिका गणेशोत्सवापुर्वी वाहतूकीसाठी खुली करायची असा ठाम निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच रस्त्याची दुसरी मार्गिका डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पुर्ण करून वाहतूकीसाठी खुली करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहीती मंत्री चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा >>> ठाणे जिल्हा प्रशासनाकडून वाळूमाफियांवर कारवाई; लोकसत्ताच्या वृत्तानंतर माफियांवर कारवाईचा बडगा
कशेडी घाटातील बोगदा तयार करण्याचे काम सुरू असून या बोगद्यातील एक मार्गिका गणेशोत्सवापुर्वी खुली करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर परशुराम घाटात दरड कोसळली तरी वाहतूक बंद राहणार नाही. त्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले. मुंबई-गोवा महामार्ग हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरील यंत्रणेला काम करताना त्रास होऊ नये म्हणून आंदोलन करू नये, अशी विनंतीही त्यांनी मनसेला यावेळी केली. १२ वर्षे लोटूनही रस्त्याचे काम पुर्ण झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण, आता काम गतीने सुरू आहे, हेही नाकारून चालणार नाही. नागोठणे भागातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यापुर्वी भेट घेऊन त्या भागातील रस्ता काँक्रीटचा करण्याची विनंती केली होती. अशाचप्रकारे इतर भागात नागरिकांनी विनंती केली होती. त्या सर्वांच्या सुचनांचा अंतभार्व करून रस्ते कामाचे नियोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. लोकशाही मार्गाने आंदोलन करता येते. पण, वेगळ्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे नुकसान होते, असेही ते म्हणाले.