लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी रात्री दिवा शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सुरू होते. या अंतर्गत धर्मवीर नगर येथे सभा सुरू असतानाच या परिसरात शॉर्ट सर्किट होऊन रामजीयावन विश्वकर्मा (५५) यांचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडूनही याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने विविध चर्चांना उधान आले आहे. भाजपने याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी रमाकांत मढवी हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.

Crime case against three people, liquor and ganja in Dombivli, Dombivli,
डोंबिवलीत मद्य, गांजा सेवन करून रस्त्यावर गैरशिस्तीने वागणाऱ्या तीन जणांवर गुन्हे
chief minister Eknath Shinde, party workers, office bearers, badlapur, election campaign 2024, mahayuti
प्रचारात मागे राहाल, पालिकेच्या तिकिटाला मुकाल, एकनाथ शिंदे…
Eknath Shinde, Uddhav Thackeray faction, Kopri,
कोपरीत शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने, दोन्ही गटाच्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण
Anand Dighe image, Kedar Dighe, Kedar Dighe news,
दिघे साहेबांची प्रतिमा फाडण्याचे धाडस होते कसे ? केदार दिघे यांचा सवाल
Sadanand Tharwal Dombivli BJP ravindra chavhan
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
eknath shinde vs kedar dighe
लक्षवेधी लढत: मुख्यमंत्र्यांना दिघेंच्या कुटुंबातून आव्हान
nitin gadkari on constitution
संविधान बदलण्याची कुणाची हिंमत नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा शहर येते. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून दिवा शहर ओळखले जाते. या भागातून आठ नगरसेवक निवडून येतात. दिवा शहरातील विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शहरातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. बुधवारी रात्री आगासन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदे हे भाषण करत असताना सभा स्थानापासून काही मीटर अंतरावर शॉर्ट सर्किट झाला. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी रामजीयावन विश्वकर्मा यांना घटनास्थळावरून बाहेर काढले. त्यावेळी त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना डायघर भागातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

आणखी वाचा-खा. श्रीकांत शिंदे यांना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी, ‘कल्याण लोकसभेसाठी भाजप म्हणेल तोच उमेदवार’

ही घटना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असतानाही शिळ -डायघर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आल्याने चर्चांना उधान आले आहे. ही घटना कशी घडली. याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारास निष्काळजीपणा करणारे आयोजक शिंदे गटाचे पदाधिकारी रमाकांत मढवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपचे दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.