शहाड रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढत असताना तोल जाऊन फलाटावर पडल्याने सागर द्रविड या तरुणाचे दोन्ही पाय फलाट आणि लोकलचे पायदान यांच्यामध्ये अडकले. पायासह तो फरफटत गेल्याने सागरला दोन्ही पाय गमवावे लागले. डोंबिवलीतील तरूणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लोकल आणि फलाटातील अंतरही प्रवाशांसाठी जीवघेणे ठरतोहे. सागर हा शहाड येथून आंबिवली येथील आपल्या घरी जात होता. शहाडहून आंबिवलीकडे येण्यासाठी निघाला असताना, लोकलमध्ये चढताना त्याचा तोल गेला. तो फलाटावर पडून लोकलचे पायदान आणि फलाट यांच्यामध्ये अडकला. त्याचे दोन्ही पाय फलाट आणि पायदान यात फरपटल्याने त्याला ते गमवावे लागले. तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी शिवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, असे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

Story img Loader