मालमत्ता देयक, नवीन पाणी जोडणी, कर आकारणीची कामे रखडली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्याण- कोटयवधी रुपये खर्च करून श्रेणीकरण केलेली कल्याण डोंबिवली पालिकेची ऑनलाईन संगणक यंत्रणा ठप्प आहे. मालमत्ता कर भरणा, देयकाची पावती, नवीन पाणी जोडणी, नवीन कर आकारणी, मालमत्ता हस्तांतरण अशी कामे ऑनलाईन माध्यमातून होत नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेत प्रत्यक्ष किंवा मोबाईलवर संपर्क करुनही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून उत्तरे मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

मागील दोन महिने पालिका संगणकीकरणाचे उन्नत्तीकरण करून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नक्की कोणती कामे केली, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. मालमत्ता कर, पाण्याची देयक पालिकेने ग्राहकांना वितरीत केली आहेत. नागरिकांनी ही देयक एक रकमी भरणा केली तर त्यांना सामान्य करातून पाच टक्के सूट मिळते. मालमत्ता देयक भरण्यासाठी नागरिक पालिकेच्या ऑनलाईन पध्दतीचा अवलंब करतात. ही यंत्रणा कोणताही प्रतिसाद देत नसल्याने नागरिक हैराण आहेत. अनेक नागरिकांनी नवीन पाणी जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यांच्या अर्जांची स्थिती काय आहे, हेही नागरिकांना कळत नाही. मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे ऑनलाईन मधील तांत्रिक गोंधळात अडकून पडली आहेत.

काही नागरिकांनी मालमत्ता कर भरणा केला आहे. त्यांना कर भरण्याची ऑनलाईन पावती मिळाली नाही. ऑनलाईन यंत्रणा ठप्प असल्याने अनेक नागरिक पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात जाऊन ठप्प असल्याने यंत्रणेविषयी तक्रारी करतात. तक्रारी ऐकून घेण्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष कोणतीही कृती कर्मचारी करत नाहीत, असे नागरिकांनी सांगितले.

दोन महिने ऑनलाईनचा त्रास

कल्याण डोंबिवली पालिकेत २२ वर्षापूर्वी ई गव्हर्नन्स पध्दत सुरू झाली. माहिती तंत्रज्ञान झपाट्याने बदलल्याने पालिकेतील संगणक यंत्रणा जुनी झाली. त्यामु‌ळे अत्याधुनिक पध्दतीची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने संगणकीकरण यंत्रणेचे उन्नत्तीकरण करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी सुमारे ३४ कोटी खर्च केले. अत्याधुनिक सुविधा देऊनही ऑनलाईन यंत्रणेत त्रृटी आढळुन आल्याने संगणक विभागातील अधिकाऱ्यांसह स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी हैराण आहेत. संगणकीय उन्नत्तीकरणाची उपयोजना, सर्व्हर क्षमता वाढ, तांत्रिक श्रेणीकरण कामे यापूर्वी पालिकेच्या संगणक विभागातील अधिकाऱ्यांनी केली होती. ग्राहकाभिमुख सेवेचा पालिका कर्मचाऱ्यांना अनुभव असल्याने त्यांनी योग्य नियोजन करून यापूर्वी संगणकीकरणाचे उन्नत्तीकरण पाच कोटी खर्चात केले होते. परंतु स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून केलेल्या उन्नत्तीकरणात काही तांत्रिक चुका झाल्या आहेत. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे, असे एका पालिका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले. उन्नत्तीकरणाची कामे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी केली असल्याने या कामात पालिका संगणक विभागातील अधिकारी, कर्मचारी हस्तक्षेप करण्यास तयार नाहीत. या वादात नागरिकांची होरपळ होत आहे.

‘श्रेणीकरण केलेल्या ऑनलाईन यंत्रणेत जसे दोष आढळून येत आहेत. ते दुरुस्त केले जात आहेत. यंत्रणा नवीन असल्याने ग्राहकांकडून त्रृटी संदर्भात ज्या सूचना केल्या जातात. त्याची दखल घेऊन सुधारणा केल्या जात आहेत. लवकरच ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू होईल,’ असे स्मार्ट सिटी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रशांत भगत यांनी सांगितले.

नवीन यंत्रणा कशी हाताळायची याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मालमत्ता कराच्या पावत्या हस्त पध्दतीने दिल्या जात आहेत, असे संगणक विभाग प्रमुख पल्लवी भागवत यांनी सांगितले.