लोकांना तत्पर सेवा देता यावी या उद्देशातून तयार केलेली कल्याण डोंबिवली पालिकेतील संगणकीकरणाची ऑनलाईन सेवा उन्नत्तीकरणाच्या नावाखाली विस्कटून टाकण्यात आली आहे. पालिका अधिकाऱ्यां बरोबर करदाते नागरिक त्रस्त आहेत.
उन्नत्तीकरणाच्या नावाखाली मार्च ते एप्रिल ही सेवा संथगतीने, कधी ठप्प पध्दतीने काम करत होती. मे मध्ये उन्नत्तीकरण करण्यात आलेली संगणकीकरणाची ऑनलाईन सेवा पूर्ववत करण्यात आली. त्यात अभूतपूर्व गोंधळ स्मार्ट सिटी कंपनीने घातल्याने पालिका संगणक विभागातील अधिकारी या सेवा पूर्ववत कशा करायच्या या संभ्रमात आहेत.
माजी आयुक्त श्रीकांत सिंग यांनी स्वताची तंत्रकुशलता, सल्लागारांच्या साहाय्याने कल्याण डोंबिवली पालिकेत २२ वर्षापूर्वी नागरिकांना ऑनलाईन सुविधा देणारी अद्ययावत यंत्रणा सुरू केली. देशातील महापालिका, शासकीय यंत्रणांनी या प्रारुपाची अंमलबजावणी केली. कर भरणा, कर आकारणी, जन्म-मृत्यू दाखले, दुकान परवाना, माहिती अर्ज, पालिकेचे ठराव, निर्णय अशी माहिती या प्रणालीतून उपलब्ध होत होती. ही यंत्रणा जुनाट (ई गव्हर्नन्स-सर्व्हर) झाल्याने संथगतीने काम करत होती. पालिका स्मार्ट सिटी कंपनीतर्फे माजी आयुक्त सूर्यवंशी यांच्या काळात चार महिन्यापूर्वी संगणकीकरणाचे उन्नत्तीकरण (अपग्रेडेशन) करण्यात आले. ही कामे करताना स्मार्ट कंपनी अधिकाऱ्यांनी पालिका संगणक विभागातील तंत्रकुशल कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता उन्नत्तीकरणाचे काम केले. जनतेला काय पाहिजे याची जाणीव पालिका संगणक अधिकाऱ्यांना होती. त्यांचा सल्ला न घेता सुमारे २५ ते ३० कोटी खर्चून उन्नत्तीकरणाचे काम पार पाडण्यात आले. हे काम करताना अभूतपूर्व गोंधळ स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी घातला.
मे पासून गोंधळ
अद्ययावत उन्नत्तीकरण प्रणाली ४ मे रोजी सुरू करण्यात आली. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या. ९० लाखाचा कर भरणा नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीतून केला. मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने मिळणाऱ्या भरणा पावत्या, कर भरण्याचे लघुसंदेश पालिकेकडून आले नाहीत. अनेकांनी कर भरणा केला. धनादेश पालिकेने वटविले. बँक खात्यामधून रकमा वर्ग झाल्या नाहीत. नवीन सदनिकेला कर लावल्यानंतर मालमत्ता क्रमांक पडल्यानंतर तात्काळ कर लावणे आणि पावती प्रक्रिया पाठोपाठ पार पडतात. नवीन रचनेत या प्रक्रियेत होत नाहीत. अनेक करदात्यांनी ऑनलाईन कर भरणा केला असला तरी पालिकेला तो कोणत्या ग्राहकाने केला आहे हे कळत नाही. त्याचे शोधकाम सुरू असल्याचे कळते. पालिका कर्मचाऱ्यांचा प्राप्तिकर कापल्यानंतर पालिकेकडून कर्मचाऱ्यांना अर्ज क्र. १६ दिला जातो. तो अद्याप कार्यरत, निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. ठेकेदारांच्या देयक मंजुरीच्या पावत्यांची नोंद ऑनलाईन प्रणालीत होत नाही. देयक देताना अडथळे येत आहेत. विवाह नोंदणी दाखले मिळण्यात अडचणी आहेत. या गोंधळामुळे संतप्त नागरिक पालिकेत कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत. गोंधळ स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी घातला लोकांच्या रोषाला आम्ही सामोरे जातो, अशी संगणक कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज आहे. हा सगळा गोंधळ निस्तरण्याचे काम सुरू आहे.
९४ कोटी वसुली
ऑनलाईन प्रणालीतील त्रुटी दरू करून लवकर सुरळीत करण्याचे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत. चालूवर्षी मालमत्ता कर वसुलीचा लक्ष्यांक ३७५ कोटी आहे. एप्रिलपासून आतापर्यंत ९४ कोटी वसुली झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा १६ कोटीने ही वसुली कमी आहे.
ऑनलाईन प्रणालीतील बहुतांशी त्रृटी दूर करण्यात येऊन नागरिक ऑनलाईन सेवेचा लाभ घेत आहेत. जी त्रृटी निदर्शनास येत आहे. ती तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. कर पावत्या हस्त पध्दतीने, ऑनलाईन प्रणालीतून देण्यात येत आहेत. लवकरच ही सेवा सुरळीत, पूर्ववत होईल. – पल्लवी भागवत ,उपायुक्त ,संगणक विभाग
ऑनलाईन प्रणालीत जे दोष दिसून येत होते. ते बहुतांशी दूर केले आहेत. नागरिकांना ज्या अडचणी येतात, त्या दूर केल्या जात आहेत. – प्रशांत भगत , महाव्यवस्थापक ,स्मार्ट सिटी