गणेश मूर्तींच्या विसर्जनावेळी होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने यंदाही विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि मूर्ती स्वीकृती केंद्रासाठी ऑनलाईन वेळ निश्चितीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विसर्जनासाठीच्या वेळ निश्चितीसाठी नागरिकांना महानगरपालिकेच्या http://tmc.visarjanslots.com/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा – ठाणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; समाजमाध्यमावर झाली होती ओळख

ठाणे महानगरपालिकातर्फे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही विशेष पर्यावरणपुरक गणेश विसर्जन व्यवस्था उभारली आहे. यामध्ये १३ कृत्रिम तलाव , २० मुर्ती स्विकृती केंद्र आणि खाडी किनाऱ्यावरील ७ विसर्जन घाटांचा समावेश आहे. गर्दीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियंत्रण करून नागरिकांना गणेश मूर्तीचे विसर्जन सुलभतेने व्हावे यासाठी ऑनलाईन वेळ निश्चिती (स्लॉट बुकिंग) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . यासाठी सार्वजनिक मंडळे व घरगुती गणेश मुर्तीच्या विसर्जनाकरिता नागरिकांना http://tmc.visarjanslots.com/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या संकेतस्थळावर नागरिकांना प्राथमिक माहिती आणि मुर्तीचा प्रकार याप्रमाणे माहिती भरावी लागणार आहे. वेळ निश्चित करून नोंदणी झाल्यावर क्युआर कोड आणि पावती उपलब्ध होणार आहे. या पावतीची छापील प्रत किंवा मोबाईलमधील डिजिटल प्रत विसर्जन स्थळी दाखवून नागरिकांना मुर्ती विसर्जन करता येणार आहे. चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मुर्तीच्या विसर्जनाकरिता सात विसर्जन घाटांच्या ठिकाणी व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्याकरिता नागरिकांना वेळ निश्चितीची गरज नाही.

अशी आहे सुविधा
ऑनलाईन वेळ निश्चितीची ही सुविधा २६ ऑगस्टपासून सुरु झाली असून सर्व कृत्रिम तलाव, मुर्ती स्विकृती केंद्रांकरिता दुपारी २ ते रात्री १० यावेळेत नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. दीड दिवसाचे,पाच दिवसाचे, गौरी विसर्जन, सात दिवसाचे आणि अनंत चतुर्दशी दिनी विसर्जनाकरिता ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

Story img Loader