डोंबिवली- ठाकुर्ली रेल्वे स्थानकात दर सोमवारी एकच तिकीट खिडकी सुरू राहत असल्याने प्रवाशांना रांगेचा मनस्ताप सहन करावा लागतो. कामावर जाण्याचा पहिलाच दिवस आणि त्यात रांगेत उभे रहावे लागत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.दर सोमवारी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात एक तिकीट खिडकीचा अनुभव प्रवासी घेत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अपुरे संख्येमुळे एक तिकीट खिडकी सुरू ठेवावी लागते, असे प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. मागील काही महिने प्रवासी हा एक तिकीट खिडकीचा त्रास दर सोमवारी अनुभवत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून मुंबई, कसारा, कर्जतकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ठाकुर्ली रेल्वे स्थानकात किमान तीन रेल्वे तिकीट खिडक्यांची गरज आहे. तेथे दोन तिकीट खिडक्या सुरू ठेवल्या जातात. सोमवार असला की कर्मचारी नाही म्हणून फक्त एक तिकीट खिडकी सुरू असते. एकच तिकीट खिडकी असल्याने प्रवाशांना १० ते १५ मिनीट रांगेत उभे राहून तिकीट घ्यावे लागते. या कालावधीत अनेक प्रवाशांच्या निश्चित वेळेतील लोकल निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो, असे ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून नियमित प्रवास करणारे प्रवासी मंदार अभ्यंकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“एक-एक करून काय फोडता, सगळेच घ्या”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर श्रीकांत शिंदेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्ही…”

या नियमितच्या त्रासाची तक्रार प्रवासी अभ्यंकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठांकडे केली आहे. त्याची दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात गंभीर दखल घेतली जाईल असे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only one ticket window is open every monday at thakurli railway station amy
Show comments