अंबरनाथः शहर नियोजन आणि शहर विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याच्या नगर विकास विभागात पात्र अधिकाऱ्यांची वानवा आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील दोन अ वर्ग नगरपालिकांच्या शहर नियोजनाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून एकाच नगररचनाकारावर सुरू आहे. त्यात त्याच नगररचनाकाराची उल्हासनगरच्या नगररचनाकारपदी प्रभारी नियुक्ती करण्याचा आदेश नुकताच नगर विकास विभागाने काढला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील तीन महत्वाच्या शहरांची जबाबदारी एकाच नगर रचनाकारावर आली आहे.

ठाणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक नागरिकरण होत असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असून घर खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे चौथी मुंबई म्हणून परिचीत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभी राहत आहेत. या दोन्ही शहरांच्या शहर नियोजनाची मोठी जबाबदारी पालिका प्रशासनावर आहे. मात्र या दोन्ही शहरांच्या शहर नियोजनाचा कारभार एकाच अधिकाऱ्यावर अवलंबून असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ नगरपालिकेत कार्यरत असलेले नगररचनाकार विवेक गौतम यांच्याकडे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगररचनाकार पदाचा अतिरिक्त कार्यभार चार महिन्यांपूर्वी सोपवण्यात आला होता. बदलापुरातील नगररचनाकाराचे पद अधिकाऱ्याच्या निवृत्तीने रिक्त झाले होते. त्यामुळे विवेक गौतम हेच अंबरनाथसह बदलापूर शहराच्या शहर नियोजनाची जबाबदारी सांभाळत होते. त्यातच उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार प्रकाश मुळे वैद्यकीय कारणामुळे रजेवर गेले. त्यांच्या रजेमुळे कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून नुकतीच नगर विकास विभागाने अंबरनाथ आणि बदलापुरच्या नगर रचना विभागाचे काम सांभाळणाऱ्या विवेक गौतम यांच्यावरच उल्हासनगरचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यामुळे आता गौतम यांना अंबरनाथ आणि बदलापूरसह उल्हासनगर शहराच्या नगररचना विभागाचाही कारभार पहावा लागणार आहे.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
tension in malad aksa village over rehabilitation of ineligible residents of dharavi
जमीन मोजणीला विरोध; अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनावरून मालाड अक्सा गावात तणाव
Redevelopment is essential for safety middle class citizen Lands freehold
सुरक्षिततेसाठी पुनर्विकास अपरिहार्य

हेही वाचा… भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

दोन अ वर्ग नगरपालिका आणि एक महापालिका अशा तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगररचना विभागाचा कारभार एकाच अधिकाऱ्याला देण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा रंगली आहे. आधीच ऑनलाईन बांधकाम परवानगीचा घोळ सुरू असताना बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यात आता एकाच अधिकाऱ्याला तिसऱ्या पालिकेचा कार्यभार दिल्याने या विभागांचे कामकाज वेळेत पूर्ण होऊ शकेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

हेही वाचा… डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा

तीनही शहरांमध्ये महत्वाचे प्रकल्प

अंबरनाथ शहरात शिवमंदिर परिसर सुशोभीकरण, हॉकी क्रीडांगण, जागतिक दर्जाचा तरणतलाव, नाट्यगृहाचा उर्वरित भाग असे अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू आहे. त्यांची कामे नगररचना विभागामार्फत सुरू आहेत. बदलापुरात पूररेषेसह इतर काही प्रकल्प सुरू आहेत. तर उल्हासनगरात पुनर्विकासाच्या कामांना गती मिळण्याची आशा आहे. या तीनही शहरांचे काम येत्या काळात खोळंबण्याची शक्यता आहे.