मुंबई : नाट्य अवकाशाविषयीचे भान, नेपथ्य-प्रकाश योजना आदी तंत्रांचा अचूक उपयोग करून घेत आपला अभिनय अधिक उठावदार कसा करता येईल, अशा अनेकविध मुद्द्यांवर अनुभवी कलाकारांकडून मार्गदर्शन मिळवण्याची संधी देणारा ‘लोकसत्ता रंगसंवाद’ हा उपक्रम युवा नाट्यकर्मींसाठी पर्वणी ठरणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांना वेबसंवादाच्या माध्यमातून मनातील प्रश्न थेट विचारण्याची संधी या रंगसंवादातून मिळणार आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेत सादरीकरण झाल्यानंतर अनेकदा आपले काय चुकले, कुठे कमी पडलो याविषयी जाणून घेण्याची संधी मिळते. यंदा स्पर्धेआधीच अभिनयासह कोणत्या कोणत्या गोष्टींवर स्पर्धकांनी भर द्यायला हवा याची माहिती तरुणाईला ‘लोकसत्ता रंगसंवाद’च्या माध्यमातून मिळत आहे. मंगळवार, ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता रंगसंवाद’चा नवा वेबसंवाद रंगणार असून यात प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा तिन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरलेले ह्रषिकेश जोशी यांच्याकडून नाट्याभिनयाविषयी जाणून घेता येणार आहे.
प्राथमिक फेऱ्यांचे तपशील
नाशिक विभागाची प्राथमिक फेरी ६ ते ७ डिसेंबर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि नागपूर विभागाची प्राथमिक फेरी ७ ते ८ डिसेंबर, नागपूर विभागाअंतर्गत अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि पुसद विभागाची प्राथमिक फेरी ९ डिसेंबर, छत्रपती संभाजीनगर विभागाची प्राथमिक फेरी १० ते ११ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर पुणे विभागीय अंतिम फेरी ७ डिसेंबर, नागपूर विभागीय अंतिम फेरी १२ डिसेंबर, मुंबई विभागीय अंतिम फेरी १३ डिसेंबर, ठाणे, नाशिक, छत्रपती, संभाजीनगर व कोल्हापूर विभागीय अंतिम फेरी १४ डिसेंबर आणि रत्नागिरी विभागीय अंतिम फेरी १६ डिसेंबरला होईल. विभागीय अंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या आठ एकांकिकांमध्ये मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी होणार असून मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ निवडली जाईल. त्यानंतर महाअंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट ३ एकांकिकांचे सादरीकरण २२ डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरू प्राधिकरणाच्या उरण येथील सभागृहात होणार आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ प्रवेश अर्ज, नियम व अटी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
मुंबई : मकरंद पाटील – ९८९२५४७२७५
ठाणे : कमलेश पाटकर (ठाणे ) – ९८२०६६४६७९, समीर म्हात्रे ( नवी मुंबई) – ९६१९६३०५६९, संजय भंडारे (वसई – विरार) – ७७२२०४८३८८, नीरज राऊत (पालघर) – ९९६०४९७३७८, अरविंद जाधव (डोंबिवली – कल्याण) – ९८२०७५२४५९
नाशिक : प्रसाद क्षत्रिय – ८०८७१३४०३३
रत्नागिरी : राजू चव्हाण – ९४२३३२२११६
छत्रपती संभाजीनगर : वंदन चंद्रात्रे – ९४२२२४५०६५, सदाशिव देशपांडे – ९९२२४००९७६
कोल्हापूर : संदीप गिरीगोसावी – ९६५७२५५२७७
नागपूर : गजानन बोबडे (नागपूर) – ९८२२७२८६०३, नितीन ईश्वरे (अमरावती- यवतमाळ) – ९७६३७०५८८७, भूषण दांडेकर (अकोला / बुलढाणा / वाशिम / पुसद) – ९०२८९३४४४६
सहभाग कसा घ्याल?
●https://tinyurl.com/rangasamwad2024 या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ज्या सत्रांमध्ये सहभागी व्हायचे असेल, त्याप्रमाणे नोंदणी करा.
●नोंदणी करून झाल्यावर ‘लोकसत्ता’कडून तुम्हाला ई-मेल आयडीवर संदेश येईल. याद्वारे वेबसंवादाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता सहभागी होता येईल.
●अधिक माहितीसाठी https://www.loksatta.com या संकेतस्थळाला भेट द्या.