रिक्षा, टॅक्सी, बस यांसारख्या व्यावसायिक वाहनचालकांपैकी बहुतांश चालकांना गुटखा, तंबाखू, पान मसाला यासारख्या हानिकारक पदार्थ खाण्याचे व्यसन असते. यामुळे अनेक धोकादायक आजारांना देखील चालकांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील व्यावसायिक वाहनचालकांची मौखिक आरोग्य तपासणी आणि व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन मोहीम हाती घेण्यात आली आहे. इंडियन डेंटल असोसिएशन आणि ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयतर्फे यांचा संयुक्तविद्यमाने हाती घेण्यात आलेली ही मोहीम एक महिना राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत आतापर्यंत दीडशेहून अधिक वाहनचालकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- कल्याणमधील तरुणाचे मारेकरी मध्यप्रदेशातून अटक

नियमित स्वरूपात गुटखा, तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांमुळे मौखिक, ओठाचा, जबड्याच्या, फुफुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कर्करोग यांसारखे आजार होण्याची दाट शक्यता असते. तसेच अनेक नागरिकांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याचे देखील अनेकदा समोर येते. यामुळे शासनातर्फे याबाबत अनेकदा जनजागृती देखील केली जाते. मात्र अनेकजण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येतात. तर रिक्षा, टॅक्सी, बस यासारख्या व्यावसायिक वाहनांचे बहुतांश चालक या तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचे दिसून येते. या सर्व वाहनचालकांच्या व्यसनमुक्तीसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे शहरातील व्यावसायिक वाहनचालकांसाठी मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा- “महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकार बोलत नाही”; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांचा आरोप

इंडियन डेंटल असोसिएशन आणि ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयतर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. ठाण्यातील तीन हात नाका येथील आरटीओ कार्यालयात डॉक्टरांकडून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. सुमारे एक महिना ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याद्वारे वाहनचालकांना डॉक्टरांकडून योग्य तो औषधोपचार साठीचा सल्ला आणि तपासणी दरम्यान ज्या वाहनचालकांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आहे त्यांना व्यसनमुक्ती साठी योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत दीडशेहून अधिक वाहनचालकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच येता एक महिना ही मोहीम सुरू राहणार असून वाहनचालकांनी त्याचा लाभ घ्यावा असे प्रादेशिक कार्यालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा- ठाणे : मनशक्ती विज्ञान संस्कार सोहळ्यात ‘माईंड जिम’चे अनोखे उपक्रम; विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे उपस्थितांना मिळाले मार्गदर्शन

व्यावसायिक वाहनचालकांमध्ये प्रामुख्याने तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे भविष्यात त्यांना दुर्धर आजारांचा सामना करावा लागतो. हे सर्व वेळीच रोखण्यासाठी या वाहनचालकांचे मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अशी माहिती ठाण्याचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oral health screening and guidance of commercial drivers by indian dental association and rto office in thane dpj