डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून पुस्तक अदान-प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २९ जानेवारी दरम्यान डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात या पुस्तक आदान प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्याचे हे यंदाचे पाचवे वर्ष आहे. यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोहळ्याचे अध्यपद भूषवणार आहेत. फडणवीसांनी स्वत:कडील बहुभाषिक पुस्तकांचे आदान-प्रदान करत या सोहळ्याचा श्रीगणेशा केला.
पुस्तक अदान-प्रदान सोहळ्याच्या माध्यमातून राज्यातील बहुतांशी ग्रंथालय, वाचनालय तसेच पुस्तक प्रेमींना या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली असल्याचा विश्वास सोहळ्याचे मुख्य आयोजक पुंडलिक पै यांनी केला. वाचकांसाठी ही पर्वणी असून डोंबिवलीत त्याचे सातत्याने आयोजन केले जात आहे. ही कौतुकाची बाब असून त्या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन फडणवीस यांनी दिले. फडणवीस यांनी स्वतःकडील दहा पुस्तकांचा संच आदान म्हणून पै समूहाला दिला आणि त्याबदल्यात पै यांनीही त्यांना प्रदान स्वरूपात पुस्तके परत दिली.
हेही वाचा- ठाणे : महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
पुस्तक आदान प्रदान सोहळा हा आता पै यांचा राहिला नसून तो डोंबिवलीकर नागरिकांचा वाचकोत्सव झाला आहे. हजारो नागरिक आबालवृद्ध त्यात सहभागी होतात याचा आनंद होतो. या सोहळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक जडण घडणीत मानाचा तुरा रोवला गेला असल्याची प्रतिक्रिया मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.