विविध क्षेत्रातील चार कलाकारांनी एकत्र येऊन डोंबिवलीतील बालभवनमध्ये आपल्या चित्र कलाकृतींचे प्रदर्शन येत्या शनिवार (ता.१०), रविवारी (ता.११) आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता वन्यजीव छायाचित्रकार आणि काँग्रेसच्या माजी नगरसेविका अलका आवळसकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>कल्याण पूर्व सिध्दार्थनगर रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालकांचा बंद; प्रवाशांचे हाल
पॅलेट ॲन्ड बियाॅन्ड संस्थेने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. डोंबिवली पूर्वेतील रामनगर मधील चिपळूणकर पथावरील बालभवन मध्ये हे प्रदर्शन आयोजित केले आहे. दोन दिवसाच्या प्रदर्शनात विविध चित्रकलाकृतींची पाहणी रसिकांना करता येता येणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी आठ वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये मोटारीच्या काचा फोडून कारटेपच्या चोऱ्या
ज्येष्ठ कलाकार आणि वास्तुविशारद चंद्रकांत सामंत यांनी काढलेली चित्र प्रदर्शनात असणार आहेत. मागील ३० वर्षाच्या काळात सामंत यांनी जलतरंग, निसर्गचित्र, व्यक्तिचित्र रेखाटली आहेत. सुरेंद्र देसाई इंटेरिअर डेकोरेटर आहेत. गिर्यारोहण, भटकंतीमधून टिपलेली काही छायाचित्रे पेन्सिलच्या माध्यमातून त्यांनी रेखाटली आहेत. शंतनु सामंत, वल्लरी सामंत यांनी पेपर पंच आर्ट, एमडीएफ आर्ट असे विविध कलाप्रकार केले आहेत. या चित्र कलाकारांच्या चित्रकलाकृती रसिकांना बालभवनमध्ये पाहण्यास मिळणार आहेत. इच्छुकांनी ९८१९०९१९५४ येथे संपर्क साधावा.