ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता “तंटामुक्त हाउसिंग सोसायटी अभियान” यासंदर्भात मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सहकारी संस्था ठाणे शहर चे उपनिबंधक विशाल जाधवर आणि सिताराम राणे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या मेळाव्यात तंटामुक्त हाउसिंग सोसायटी अभियानासह देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर झेंडा अभियान आणि स्वयंपूर्ण स्वयंपूनर्विकास याविषयांवरही मार्गदर्शन केले जाणार आहे.त्यासह,यावेळी केंद्र शासनाच्या सहकार विभागातर्फे आयोजित केलेला जिल्हास्तरीय हाऊसिंग सोसायटी पुरस्कार सोहळा देखील पार पडणार आहे. हा कार्यक्रम ठाण्यातील बी केबिन येथील नाईक सभागृहात होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organizing tentamukt housing society campaign amy