Pratap Sarnaik in Ovala Majiwada Vidhan Sabha Constituency : २००९ च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत काही मतदारसंघांचं विभाजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये ठाण्यातील काही मतदारसंघांचही विभाजन झालं. हे विभाजन होऊन ओवळा माजिवडा हा मतदारसंघ निर्माण झाला. हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही समित्यांचाही यात समावेश आहे. २००९ सालापासून या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक जिंकून येत आहेत. यंदाही महायुतीतून त्यांनाच तिकिट मिळण्याची शक्यता आहे.

उच्चभ्रू लोकांचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. कारण, गेल्या काही वर्षांत या विभागात झालेल्या विकासकामांमुळे ठाण्यातील सर्वांत मोठ्या वसाहती आणि सोसायट्या याच मतदारसंघात येतात. २००९ सालापासून आमदार प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजिवडा मतदारसंघ आपल्या काबूत ठेवला आहे. २०१४ मध्ये शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामुळे येथील लढत चुरचीशी ठरली होती. या चुरशीच्या लढाईतही प्रताप सरनाईक यांनी बाजी मारली होती. प्रताप सरनाईक यांनी २०१४ ला भाजपाच्या संजय पांडे यांचा १० हजारांच्या फरकाने पराभव केला होता. २०१९ मध्ये युतीचे उमेदवार म्हणून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसचे विक्रांत भीमसेन त्यांच्याविरोधात होते. तेव्हाही प्रताप सरनाईक यांनी ८४ हजार मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली होती.

Aaditya Thackeray On Mumbai University Senate Election 2024
Aaditya Thackeray : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा १० जागांवर विजय, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “इथूनच विजयाचा…”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली

हेही वाचा >> Mira Bhayandar Vidhan Sabha Constituency 2024 : अपक्ष आमदाराच्या मतदारसंघात कडवी झुंज; भाजपा मारणार बाजी की महाविकास आघाडीला मिळणार संधी?

यावेळी परिस्थिती त्याहूनही वेगळी आहे. दोन पक्षांतील फूटीमुळे महायुतीतून प्रताप सरनाईक यांना संधी मिळाली तरी महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या पक्षाकडे जातेय हे पाहावं लागेल. सध्या तरी राजकीय चर्चांनुसार ही जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेही शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात कोणत्या समस्या?

ठाण्यातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर अशा बैठ्या चाळीच्या मध्यम आणि गरीब वर्गाची लोकवस्तीही या मतदारसंघात आहे. तर वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भागही याच मतदारसंघांमध्ये येतो. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग देखील ओवळा माजिवडा याच मतदारसंघात मोडतात. एका बाजूला टोलेजंग इमारती, तर दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या बैठ्या चाळी येथे आहेत. तर, घोडबंदर रोड, भिवंडी बायपास, मुंबई नाशिक महामार्ग हेही याच मतदारसंघातून जातात. या रस्त्यांची दूरवस्था झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दिवसेंदिवस येथील लोकवस्ती वाढत असल्याने वाहतूक कोंडीचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर, दुसरीकडे टोलेजंग इमारती असल्या तरीही येथे काही भागात पाण्याची मोठी समस्या आजही भेडसावते आहे. या सर्व बाबींवर यंदाचं मतदान होण्याची शक्यता आहे.