कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २०० हून अधिक बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या नाहीत. बहुतांशी बेकायदा फलक माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने लावण्यात येत आहेत. या बेकायदा फलकांवर स्वताचा ताबा ठेऊन काही राजकीय मंडळी या माध्यमातून पालिकेला अंधारात ठेऊन व्यवसाय करत असल्याची माहिती काही नोंदणीकृत जाहिरात कंपन्यांच्या मालक, अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

घाटकोपर येथे फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पापांचे जीव गेले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आता जागे झाले आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कल्याण पूर्व, शिळफाटा रस्ता आणि काटई भागात सर्वाधिक बेकायदा फलक लावले जात आहेत. हे सर्व फलक काही माजी नगरसेवक, राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने लावले जातात. अशाप्रकारे फलकासाठी जागा अडवून तेथे मोबदला घेऊन इतरांना जाहिराती लावण्यास मुभा द्यायची असे प्रकार कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे नोंदणीकृत जाहिरातदार कंपन्यांच्या मालक, अधिकाऱ्यांनी सांगितले.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sale of illegal liquor pune, illegal liquor pune, pune,
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू विक्री प्रकरणी १२६७ गुन्हे दाखल
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
MLA Rohit Pawar alleged that MLAs gave contracts in Municipal Corporation to their relatives
पिंपरी : चिंचवडमध्ये आमदारांच्या नातेवाइकांचा कंत्राटदार ‘पॅटर्न’; कोणी केला हा आरोप

आणखी वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने कल्याण शहर अघोषित बंद

कल्याण, डोंबिवलीत राजकीय वजनदार मंडळी ज्या भागात अधिक आहेत. तेथे बेकायदा फलकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या फलकांवर वर्षभर याच मंडळींचे, त्यांचे समर्थक यांचे वाढदिवस, इतर उपक्रमांचे कार्यक्रम, प्रतिमा सतत झळकवल्या जातात, असे सुत्राने सांगितले. पालिका अधिकाऱ्यांनी अशा बेकायदा फलकांवर कारवाई केली तर त्यांना राजकीय मंडळी दबाव आणून ती कारवाई थांबविण्यास भाग पाडतात. या माहितीला काही पालिका अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

पालिकेचे नुकसान

काही जाहिरात कंपन्या कल्याण डोंबिवली पालिकेकडून रस्त्यांवर फलक लावण्यासाठी दर भरणा करून जागा निश्चित करतात. फलकाच्या एका बाजुला लावण्यात येणाऱ्या फलकाचा दर कंपन्यांनी पालिकेकडे भरणा केलेला असतो, पण काही जाहिरातदार फलकाच्या दुसऱ्या बाजुला पालिकेला अंधारात ठेऊन जाहिराती लावून स्वताचा आर्थिक फायदा करतात आणि पालिकेचे आर्थिक नुकसान करत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

आणखी वाचा-बेकायदा ९० फलकांकडे डोळेझाक, संरचनात्मक परिक्षण अहवाल तपासणी यंत्रणेविना; ठाणे महापालिकेचा कारभार

फलक तपासणी आदेश

घाटकोपर मधील फलक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाने पालिका हद्दीतील धोकादायक, अतिधोकादायक फलकांची पाहणी करून अशा धोकादायक फलकांवर मालमत्ता विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मालमत्ता विभागाचे उपायुक्त धर्येशील जाधव यांनी दिली. मालमत्ता विभागाकडून १८२ जाहिरात फलकांना परवानगी देण्यात आली आहे. अशा फलकांमुळे पावसाळ्यात कोणताही धोका नको म्हणून अशा सर्व फलकांची जाहिरातदार कंपन्यांच्या मालकांनी संरचनात्मक तपासणी करून तो अहवाल मालमत्ता विभागाकडे दाखल करावा. परवानगी व्यतिरिक्त असलेल्या फलकांवर कारवाई करण्याचे आदेश प्रभाग साहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.

पालिका हद्दीत मालमत्ता विभागाच्या परवानगी शिवाय लावण्यात आलेल्या फलकांवर कारवाई केली जाणार आहे. अधिकृत फलक लावणाऱ्या कंपन्यांना संरचनात्मक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. -धर्येशील जाधव, उपायुक्त, मालमत्ता विभाग.