ठाणे : यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकलेला नसून या पराभवाचे राजकीय जाणकारांकडून वेगवेगळ्या पध्द्तीने विश्लेषण करण्यात येत आहे. असे असतानाच, आता ओवळा माजीवडा मतदार संघातून निवडणूक लढलेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी पराभवावर कवितेतुन भाष्य केले आहे. बघ माझी (मनसे) आठवण येते का?, असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनसे पक्ष स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठे यश मिळाले होते. या निवडणुकीत पक्षाचे ९ आमदार निवडून आले होते. त्यानंतर मात्र झालेल्या निवडणुकीत पक्षाचे आमदार संख्या कमी होत गेली. गेल्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मधून मनसेचे प्रमोद पाटील हे एकमेव आमदार निवडणून आले होते. यंदाच्या निवडणुकीत मनसे ही जागा जिंकेल आणि त्यासोबतच अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अविनाश जाधव यांच्यासह इतर नेते विजयी होतील, अशी पक्षाला आशा होती. परंतु या सर्वच जागांवर मनसेचा पराभव झाला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप पाचंगे हे ओवळा माजीवडा मतदार संघातून निवडणूक लढले आणि त्यात त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत झालेल्या पराभवावर पाचंगे यांनी कवितेतुन भाष्य केले असून त्यांची कविता समाजमाध्यमावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा…भाज्यांचे दर कडाडले; थंडीच्या लाटेमुळे भाजी काढणीसाठी विलंब झाल्याने आवक घटली

“सकाळी घरातून कामाला जायला निघ, रिक्षावाल्याला विचार स्टेशनला येतो का? , तो म्हणेल “हिंदी मे बात करो”, तू चिडशील महाराष्ट्रात मराठीतच बोलावे लागेल म्हणशील, तो उर्मटपणे बोलेल, ‘हिंदी राष्ट्रभाषा है,नही बोलूंगा’, बघ माझी आठवण येते का?”, असे पाचंगे यांनी म्हटले आहे. “गणपतीसाठी कोकणात गावी जायला ट्रेनची बुकिंग कर, मुले सीबीएसई, आयसीएसई शाळेत शिकत असतील, ते म्हणतील डॅडी आमची परीक्षा आहे, शाळेला सुट्टी नाही, बघ माझी आठवण येते का?, गाडी काढ घरच्यांना घेऊन फिरायला जा, रस्ता खराब असेलच, खड्ड्यातून मार्ग काढ, टोल लागेल.. गुपचूप टोल भर, बघ माझी आठवण येते का?” अशी टिप्पणी त्यांनी कवितेतून केली आहे. खरं तर मनसेची आठवण यावी असे खूप प्रसंग येतील, असो सहज सुचले म्हणून लिहून सोशल मीडियावर टाकले, असा उल्लेख ही त्यांनी केला आहे.

हेही वाचा…जिल्ह्यात हवेची गुणवत्ता मध्यम; तर खासगी हवेच्या निर्देशांकानुसार हवेची गुणवत्ता वाईट

मनसेच्या कार्यालयात अनेक जण समस्या घेऊन येतात आणि प्रत्येक पदाधिकारी त्यांच्यासाठी लढतो. त्यांना न्याय मिळवून देतो. परंतु जेव्हा निवडणूकित मनसेला जनतेची गरज असते, तेव्हा इतरांच्या भूलथापा, आमिषामुळे मनसेचा विसर पडतो, ही शोकांतिका असून ती कवितेतून मांडली आहे.संदीप पाचंगे मनविसे प्रदेश सरचिटणीस