ठाणे : भिवंडी येथील पडघा भागात शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना उघडीस आली. हा गोळीबार मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुरज ढोकरे (३७) याने केल्याचे समोर आले असून त्याला अहमदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरज हा गेल्याकाही वर्षापासून बेटिंग ॲपच्या माध्यमातून पैसे गमावत होता. त्याच्यावर ४० ते ४२ लाख रुपयांचे कर्ज होते. कर्ज फेडण्यासाठी त्याने  चोरीचा मार्ग निवडला होता. त्याने यापूर्वी पिस्तुलाचा धाक दाखवून चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

पडघा येथील मेंदे गावाजवळ दोघांवर पिस्तुलीने आठ गोळ्या झाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, मिलिंद शिंदे तसेच पडघा, कसारा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला होता. सीसीटिव्ही आणि तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी तपास केला असता आरोपी बसगाडी मार्गे अहमदनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये मोटार चालकाचा तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न

याबाबत माहिती मिळाल्यानंतर अहमदनगर पोलिसांनी कोल्हार बस स्थानकाजवळ सुरजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यात तो मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल असल्याचे समोर आले. त्याला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  सुरज हा गेल्याकाही वर्षापासून बेटिंग ॲपच्या माध्यमातून पैसे गमावत होता. त्याच्यावर विविध बँक आणि पतपेढीचे ४० ते ४२ लाख रुपयांचे कर्ज होते. कर्ज फेडण्यासाठी त्याने  चोरीचा मार्ग निवडला होता. त्याने यापूर्वी पिस्तुलाचा धाक दाखवून चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader