कुष्ठरुग्णांसाठी ४० वर्षाहून अधिक काळ काम करणारे येथील पद्मश्री गजानन माने यांना डोंबिवली भूषण पुरस्कार, याज्ञवल्क्य पुरस्कार नाशिकचे पंडीत शांताराम भानोसे यांना जाहीर करण्यात आला आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. प्रा. सुरेश शेवडे यावेळी उपस्थित राहतील. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात संध्याकाळी साडे चार वाजता कार्यक्रम होणार आहे, असे अध्यक्ष प्रदीप जोशी यांनी सांगितले.
हेही वाचा >>>कडोंमपा पालिका शाळेत ६४२ शाळाबाह्य मुलांना प्रवेश
सावरकर पुरस्कार पंकजा वल्ली यांना डोंबिवली- जम्मू काश्मिरमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी काम करणाऱ्या किलांबी पंकजा वल्ली यांना स्वा. सावरकर पुरस्कार जाहीर झाला आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. शनिवारी, संध्याकाळी सहा वाजता टिळकनगर शाळेच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे, असे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी सांगितले.