|| निखिल मिस्त्री
मासवण आरोग्य केंद्रात रुग्णांची लूट; उपचाराच्या मोबदल्यात आदिवासींना पेटीत पैसे टाकण्याची सूचना
आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना मोफत सेवा देणे अपेक्षित असतानाही पालघर तालुक्यातील मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचारासाठी गोरगरीब रुग्णांकडून बेकायदा शुल्क आकारले जात आहे. आरोग्य केंद्रातील एका दानपेटीत पैसे टाकण्यासाठी रुग्णांना प्रवृत केले जाते. जिल्हा आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांनी छापे टाकून कारवाई केली.
रुग्णांकडून इंजेक्शनसाठी १० रुपये आणि सलाइन लावण्यासाठी ८० रुपये शुल्क आकारण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉ. विष्णुदास काळे यांच्या सांगण्यावरून हे पैसे घेतले जात असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या प्राथमिक आरोग्य केंद्रात गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पैसे आकारले जात असल्याची माहिती ‘लोकसत्ता’च्या हाती लागल्यानंतर याबाबतची सत्यता पडताळण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यांनतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी या ठिकाणी छापे टाकले. त्यांनी ही पेटी उघडली असता त्यात हजारो रुपये आढळून आले. या पेटीतील पैशाची कोणतीच नोंद करण्यात आलेली नव्हती. येथील परिचारिकांना आणि कनिष्ठ डॉक्टरांना पैसे घेण्याचे कारण विचारले असता डॉ. काळे यांच्या सांगण्यावरून पैसे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. काळे यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जाब विचारला असता रुग्ण कल्याण समितीला तोंडी सांगून पैसे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. गरजू रुग्णांच्या कल्याणासाठी पैसे घेत असल्याचे ते म्हणाले. मात्र या पैशाच्या हिशोबाचा लेखी पुरावा त्यांच्याकडे नव्हता.
पैसे कसे घेतात?
मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण आला की त्याची नावनोंदणी केली जाते. पाच रुपये घेऊन केसपेपर काढला जातो. त्यानंतर डॉक्टरांकडे केसपेपर पाठवला जातो. संबंतिध रुग्णाच्या नावाची पुकारणी झाल्यावर डॉक्टर त्याला तपासून इंजेक्शन लिहून देतात. इंजेक्शन घेण्यासाठी इंजेक्शन रूममध्ये गेल्यावर त्याच्याकडून १० रुपये घेतात आणि ते परिचारिकेमार्फत पेटीत टाकले जातात. या पेटीची चावी डॉ. काळे यांच्याकडेच असते, अशी माहिती पुढे आली आहे. रुग्णांना अशक्तपणा किंवा ताप आला तर त्याला सलाइनच्या गरज असल्याचे सांगून तात्पुरते दाखल करून घेण्यात येते. त्यांनतर त्याला सलाइन लावली जाते. एका सलाइनचे ८० रुपये घेतले जातात. दररोज किमान २०० रुग्ण या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येतात. याचा अर्थ दररोज किमान दीड ते दोन हजार रुपये या पेटीद्वारे जमा होत आहेत.
मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा जाबजबाब घेतलेला आहे. त्याबाबतचा अहवाल सादर झाला असून तक्रार दाखल करण्यात येणार आहे. विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. – डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी
आरोग्य केंद्रात अशा प्रकारे पैसे घेऊन पेटीत टाकत असल्याची कल्पना डॉक्टर काळे यांनी रुग्ण कल्याण समितीला दिली नव्हती किंवा त्या समितीच्या बैठकीत असा कोणताच प्रस्ताव नव्हता. असे पैसे घेणे अयोग्य आहे. – कमळाकार दळवी, अध्यक्ष, रुग्ण कल्याण समिती