भिवंडी येथे एका आंदोलनादरम्यान, १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी मेरी पाठशाला या संस्थेच्या सदस्यांविरोधात आणि आंदोलनात सहभागी झालेल्या काही जणांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाण्यात भाजप-शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र; भाजपचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला

शालेय शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने एका खासगी शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून मेरी पाठशाला या संस्थेचे सदस्य, विद्यार्थी आणि पालक शाळेबाहेर आंदोलन करत आहे. त्याचवेळी एका १२ वर्षीय विद्यार्थ्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणा दिली. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर याप्रकरणी आयोजकांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan zindabad slogans chanted by schoolboy in bhiwandi zws