पळसुंडे गाव , तालुका-मोखाडा
ठाणे-पालघरमधील अनेक गावपाडय़ांवर पावसाळ्यात साथीचे आजार आणि उन्हाळ्यात कमालीचे दुर्भिक्ष अशा दोन्ही ऋतूंत पाणी रहिवाशांचे प्राण अगदी कंठाशी आणतो. मोखाडय़ापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेले पळसुंडे हे गावही त्यापैकीच एक. खोच धरणामुळे बारमाही वाहणारी पिंजाळ नदी जवळ असूनही गावात मात्र पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष् आहे. उन्हाळ्याच्या या अखेरच्या दिवसात तरहंडाभर पाण्यासाठी त्यांना अक्षरश: वणवण करावी लागते..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुख्य रस्त्यावरून पुलाची वाडी नावाची छोटी वस्ती ओलांडली की साधारण एक-दीड किलोमीटर अंतरावर पळसुंडे गावाची पाटी दिसते. मोखाडा तालुक्यापासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावरील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या या तंटामुक्त गावास निकमवाडी आणि विकासवाडी अशा दोन उपवस्त्या आहेत. पूर्वी आता जिथे निकमवाडी आहे, तेच मूळ गाव होते. मात्र साथीच्या आजारात मूळ गावठाण तिथून उठले. संपूर्ण गावात साधारण शंभरएक घरे. लोकसंख्या ७०० च्या आसपास. शेती हेच प्रमुख उपजीविकेचे साधन. मात्र ती फक्त पावसाळ्यापुरती मर्यादित. भात, नाचणी,वरी हीच पारंपारिक पिके. त्यामुळे पावसाळा संपला की गावातील तब्बल दोनशेजण रोजगारासाठी इतरत्र स्थलांतर करतात. कारण गावात दुसरे उपजीविकेचे कोणतेही साधन नाही आणि एकपिकी शेतीवर कुटुंबाची बारमाही गुजराण होणे मुश्कील आहे. सध्या एप्रिल महिना असल्याने गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे ठरावीक वेळाने साठणारे पाणी मिळविण्यासाठी विहिरीवर अहोरात्र पहारा देण्याशिवाय गावकऱ्यांना गत्यंतर नाही. वीस वर्षांपूर्वी गावात नळपाणी योजना राबविण्यात आली. मात्र नळाने घरपोच पाणी मिळविण्याचा आनंद पळसुंडेवासीयांना फार काळ घेता आला नाही. अवघ्या काही दिवसांत या भागातील इतर अनेक नळपाणी प्रकल्पांप्रमाणे ही योजनाही नादुरुस्त होऊन त्यातून पाणी येईनासे झाले आणि गावकऱ्यांच्या नशिबी पुन्हा पाण्यासाठी विहिरीचा तळ उपसणे नशिबी आले.
पाणी असूनही टंचाई
खोच धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे बारमाही प्रवाह असणारी पिंजाळ नदी या गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरून वाहते. याच प्रवाहातून गावात वीस वर्षांपूर्वी नळपाणी योजना राबविण्यात आली होती. मात्र ती फार काळ टिकली नाही. गावालगत पिंजाळ नदीवर पाटबंधारे विभागाने बंधारे बांधले. मात्र त्यामुळे कधीही पाणी अडल्याचे आठवत नसल्याचे गावकरी सांगतात. अगदी गेल्या वर्षी बांधण्यात आलेला बंधाराही अगदी कोरडाठाक आहे. एकीकडे शेसव्वाशे किलोमीटर अंतरावरील शहरांना या भागातील धरणांमधून पाणी पुरवठा होतो, मग दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आमच्या गावात पाणी का आणता येत नाही, हा जगन्नाथ पाटील या तरुण ग्रामस्थाने विचारलेला प्रश्न विचार करायला लावतो. ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन जलयुक्त शिवार योजना राबवीत आहे. नवे जलाशय निर्माण करण्याबरोबरच शासनाने जर असे गळके बंधारे दुरुस्त केले तरी फार मोठे जलसंधारण होऊ शकेल, असे या परिसरात फिरताना लक्षात येते. पाण्याच्या प्रश्नावर गावातील महिला आता संघटित झाल्या आहेत. अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या हिरा साबळे, पोलीस पाटील कविता पाटील आणि इतर महिलांनी पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे मिटविण्याचा निर्धार व्यक्त केला.
आयआयटीयन्सच्या माजी विद्यार्थ्यांची मदत
गावातील ही पाणी टंचाई लक्षात घेऊन आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी थेट नदीतून पाणी उचलून ते गावात आणले आहे. नदीतील पाणी पंपाद्वारे उचलून गावाच्या मध्यभागी बांधलेल्या एका हौदात सोडले जाते. गावकरी मग तिथून ते पाणी घेऊन जातात. पिण्याचा प्रश्न कायम असला तरी त्याव्यतिरिक्त लागणारे पाणी या योजनेमुळे गावकऱ्यांना मिळू लागले आहे. याच हौदातील पाण्याचे शुद्धीकरण करून प्रत्येक घराला किमान काही लिटर पिण्याचे पाणी देण्याची एक योजना विचाराधीन आहे. त्यासाठी रोटरी समूहाची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रकाश गुप्ते हे आयआयटीयन्स चार वर्षांपूर्वी या गावात आले. त्यांनी आयआयटी माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून गावात विविध योजना राबविण्यास सुरुवात केली. गावातील मुलांनी संगणक साक्षर व्हावे म्हणून काहींनी त्यांच्याकडचे संगणक/लॅपटॉप दिले. सध्या पळसुंडे गावात दोन संगणक आणि चार लॅपटॉप आहेत. जगन्नाथ पाटीलचे घर हेच गावचे संगणक प्रशिक्षण केंद्र. जगन्नाथ आधी स्वत: एकलव्य बाण्याने संगणक शिकला. आता तोच गावातील मुलांना संगणकाचे प्रशिक्षण देत आहे. त्याच्या या प्रशिक्षण केंद्रात सध्या २७ मुले शिकतात. प्रकाश गुप्ते गेली चार वर्षे गावाला नियमितपणे भेट देत आहेत. गावात वृक्ष संवर्धनाची मोहीम सुरू असून त्यामुळे गावशिवारातील उजाड माळरानांवर हिरवाई फुलू लागली आहे.
पाण्याच्या शोधात नशिबी अपंगत्व
पळसुंडेवासीयांना पाण्यासाठी बाराही माहिने वणवण करावी लागत असली तरी एप्रिल आणि मे हे दोन महिने त्यांच्यासाठी अक्षरश: युद्धाचा प्रसंग असतात. विशेषत: महिलांची तर सत्त्वपरीक्षाच असते. मोखाडा तालुक्यात काही वर्षांपूर्वी पाणी भरायला गेलेली एक लहान मुलगी विहिरीत पडून मृत्युमुखी पडली होती. तशाच प्रकारचा अपघात गेल्या वर्षी पळसुंडे गावातही घडला. पाण्यासाठी सलग काही रात्री जागरण झालेल्या आशा रमेश पाटील विहिरीवर नंबर लागतोय, म्हटल्यावर घाईने जाताना पडल्या. या अपघातात त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली. सरकारी रुग्णालयात उपचार होऊ न शकल्याने त्यांना खाजगी उपचार घ्यावे लागले. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च झाला. तो आता कायमचा अधू झाल्याने त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.