पालघरमध्ये अॅक्रिलीक कंपनीत गुरुवारी सकाळी भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वरई- सातीवली येथे ही कंपनी असून या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

वरई- सातीवली येथे वॉटर पार्क रायडर्स ही कंपनी असून या कंपनीत गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Story img Loader