कल्याण- मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील बारावे येथील उपकेंद्रात पाली भाषेचे अभ्यास वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या अभ्यास वर्गासाठी प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी उपकेंद्रात येऊन प्रवेशाची पूर्ण करण्याचे आवाहन अभ्यास केंद्र चालकांनी केले आहे.
जगातील अनेक विद्यापीठांमध्ये पाली भाषेचा अभ्यास केला जातो. या भाषेचे जागतिक स्तरावरील महत्व ओळखून मुंबई विद्यापीठाने कल्याण येथील उपकेंद्रात पाली भाषेचे अभ्यास वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विशेष संधी म्हणून दर शनिवार, रविवारी दोन तासांचे हे वर्ग घेण्यात येणार आहेत.
एक वर्षाचा पाली भाषा आणि साहित्य प्रमाणपत्राचा बौध्द अध्ययन आणि विपश्यना, परयती परिपत्ती अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे चालविले जातात. एम. ए. विस्तारित अभ्यासाची सोय उपकेंद्रात करण्यात आली आहे. कोणत्याही वयोगटातील नागिरक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुकांनी ९९६७३३४६४७. या क्रमांकाशी संपर्क साधावा ..