लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोंबिवली: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे शनिवारी श्री भगवान परशुराम यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. परशुराम भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

डोंबिवली पूर्वेतील टाटा लाईन खालील स्वामींचे घर, सर्वेश सभागृह, रॉयल महाविद्यालय, गणेश मंदिर, फडके रस्ता, शिवाजी चौक, बोडस मंगल कार्यालय, आफळे मठ रामंदिर असा पालखी मार्ग असणार आहे.

आणखी वाचा- ठाण्यात पुन्हा ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी

संध्याकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. आफळे मंदिर मठ येथे समारोपाच्या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली जाणार आहेत. या उपक्रमाला वेद विज्ञान मंडळ, राघवेंद्र मठ, अंत्येष्टी पुरोहित मंडळ या संस्थांनी सहकार्य केले आहे.

पालखी सोहळ्यात सनई-चौघडा, भजनी मंडळे, ढोल ताशा पथकांचा सहभाग असणार आहे. विद्यार्थी यावेळी विविध प्रकारची प्रात्यक्षिके दाखविणार आहेत.