विद्याíथनीवरील अत्याचार प्रकरण
चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या नऊ वर्षीय विद्याíथनीवर शाळेतल्याच शिक्षकांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या शाळेतील अन्य विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी जोपर्यंत शाळा देत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेतच न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी शाळेतील महिला कर्मचाऱ्याला गुरुवारी अटक केली.
विद्यार्थिनीवर वर्षभर अत्याचार होत असल्याने शाळेतील इतर विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले आहेत. गुरुवारी काही पालकांनी मीरा रोड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देईपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी पोलिसांसमोर जाहीर केला. दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारपासून ही शाळा सुरू होत आहे. मात्र सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच पालक शाळेबाहेर जमणार असून शाळेच्या बस शाळेबाहेर येण्यास प्रतिबंध केला जाणार आहे, तसेच शाळेत सोडायला येणाऱ्या पालकांनाही मुलांना शाळेत पाठवू नका, अशी विनंती हे पालक करणार आहेत.
आक्रमक झालेल्या पालकांची पोलिसांनी समजूत काढली. शाळा व्यवस्थापन आणि पालकांचे प्रतिनिधी यांची दोन दिवसांत संयुक्त बठक आयोजित करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पोलिसांकडून मिळाल्यानंतर पालक शांत झाले. परंतु बठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर सोमवारपासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचे आंदोलन सुरू करणार असल्याचे पालकांनी या वेळी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा