School Male Cleaner Abuse Girls in Badlapur : बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध मंगळवारी संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शने केली. सकाळी साडे सहा वाजल्यापासून पालक आणि नागरिक शाळेबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिला. आरोपीला कठोर शिक्षा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलिस आणि शाळा प्रशासनावर टिकीची झोड उठवली जात असतानाच सोमवारी शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबीत करण्यात आले. मंगळवारी पालक आणि सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी पालक आणि बदलापुरकर शाळेच्या बाहेर जमू लागले होते. सकाळी आठ वाजेपर्यंत हजारो नागरिक शाळेच्या बाहेरील रस्त्यावर जमले होते.

हे ही वाचा… पोलीस भरतीमध्ये यंत्राचा वापर करुन काॅपीचा प्रयत्न; पाच उमेदवारांसह सातजण अटकेत

हे ही वाचा… वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, ७५ वर्षीय आरोपी अटकेत, अंबरनाथमध्ये संताप

घटनेचे गांभीर्य न ओळखता दुर्लक्ष करणारे पोलिस, शाळा प्रशासन यांच्याविरुद्ध आंदोलक घोषणा देत होते. आंदोलनात शहरातील महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग दिसून आला. विविध संदेश आणि इशारा देणारे फलक यावेळी आंदोलक झळकावत होते. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेची जुनी इमारत ते थेट माजी खासदार कपिल पाटील यांच्या कार्यालयापर्यंत आंदोलक पसरले होते. पोलीस प्रशासन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दहा वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents citizens agitation at badlapur in school girl sexual harassment case asj