बदलापूर : येथील आदर्श शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरुद्ध नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे धुमसत असलेले बदलापूर शहरातील वातावरण गुरुवारी शांत होते. शहरातील सर्व दुकाने, व्यापारी संकुले आणि शाळा नियमित स्वरूपात सुरू होत्या. मात्र आपल्या मुलांना शाळेत सोडणाऱ्या पालकांच्या चेहऱ्यावर चिंता कायम दिसून आली. तर कोणतेही घटना घडू नये म्हणून आदर्श शाळेसमोरील पोलीस बंदोबस्त कायम होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बदलापूर शहरातील आदर्श विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी हजारो बदलापूरवासी रस्त्यावर उतरले आणि उग्र आंदोलन केले. या आंदोलनाला आलेल्या हिंसक स्वरूपामुळे मंगळवारी शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता, तर परिस्थिती सावरण्यासाठी लावलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे शहराला पोलीस छावणीचे रूप आले होते. याचे पडसाद बुधवारीदेखील शहरात दिसून आले.
हेही वाचा >>> अंबरनाथमध्ये ३५ वर्षांच्या व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी बदलापूर शहरात धाव घेत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. तर कोणत्याही अफवा पसरू नये यासाठी संपूर्ण शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. तर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व शाळा, दुकानेदेखील बंद होते. यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. तर गुरुवारी मात्र शहरातील जनजीवन पूर्वपदावर आल्याचे दिसून आले. सर्व दुकाने, व्यापारी संकुले, शाळा, महाविद्यालय सुरू झाली होती. यावेळी आपल्या लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनी हजेरी लावली होती. शाळेत पाल्याला सोडण्यासाठी रिक्षा, बस यांची सुविधा असतानादेखील गुरुवारी मात्र पालकांनी स्वत: उपस्थित राहून आपल्या लहानग्यांना शाळेत सोडले. तर त्यांना शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठीदेखील मोठी गर्दी केली होती. यामुळे शाळा जरी सुरू झाल्या असल्या तरी त्यांचे पालक भेदरलेल्या अवस्थेत दिसून आले.
अजित पवार यांना गृहखाते द्या विद्या चव्हाण
राज्याचे गृहखाते हे अजित पवार यांच्याकडे द्यावे. ते कडक स्वभावाचे आहेत, ते नीट पद्धतीने सांभाळू शकतील. कारण देवेंद्र फडणवीस हे सध्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेण्याकडे त्यांचे जास्त लक्ष आहे. त्यामुळे त्यांना गृहखाते सांभाळता येत नाही, अशी टीकाशरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी बदलापूर येथे केली.
घटनेचे सीसीटीव्ही चित्रण गायब पटोले
नंदुरबार : बदलापूर घटनेचे सीसीटीव्ही चित्रण गायब करण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. संबंधित शाळा भाजपशी संबंधित असल्यानेच पोलिसांवर दबाव होता. पालक संस्था चालकांकडे गेल्यानंतर त्यांनी देखील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. १२ आणि १३ तारखेला घटना झाल्यानंतर संबंधित सीसीटीव्ही चित्रण या लोकांनी गायब केले असल्याचा आरोप पटोले यांनी केला. काही सामाजिक संस्थांनी दबाव आणल्यानंतर पोलिसांना नाईलाजाने गुन्हा दाखल करावा लागल्याचे पटोले यांनी सांगितले.
योजनेच्या जाहिरातीवर दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले असले, तरी राज्यातील ‘लाडकी बहीण’ असुरक्षितच आहे’. बदलापूर, कोल्हापूर, सातारा, दौंड या भागांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडल्यानंतरही गृह विभागाकडून अपेक्षित कारवाई केली गेली नाही. – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
शाळा सुरू झाल्या मात्र मुलीला शाळेत सोडताना सतत तिची चिंता होती. घडलेल्या घटनेमुळे मनात भीती निर्माण झाली आहे. तसेच गेले दोन दिवस शहरात झालेल्या उग्र आंदोलनामुळे पुन्हा काही विपरीत घटना तर नाही होणार ना? अशी सतत चिंता होती. – पालक, बदलापूर