बदलापूर शहरात नागरिकांसोबत वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येवर पालिकेने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून यासाठी बदलापूर पूर्व व पश्चिम भागात बांधकाम व्यवसायिकांकडून समायोजित आरक्षणाच्या बदल्यात पालिकेने दोन वाहनतळ बांधून घेतले आहेत. परंतु, हे वाहनतळ सध्या बांधून झाले असले तरी, काही तांत्रिक बाबी व निविदा प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्याने नागरिकांना किमान दोन महिने प्रतिक्षा याची करावी लागणार आहे.
बदलापूर पूर्वेला उड्डाण पूलाजवळ व पश्चिमेला रेल्वेस्थानक परिससरातील महादेव मंगल कार्यालयाचे जवळ हे दोन वाहनतळ बांधले असून यांमुळे बदलापूर पूर्व व पश्चिम भागातील दुचाकीस्वारांची सोय होणार आहे. सध्या दोन्ही बाजूस या वाहनतळाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर दुचाकीस्वार दुचाकी उभ्या ठेवत असून यांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच या दुचाकींची संख्या वाढली असून पूर्वेला रेल्वेने त्यांच्या हद्दीत वाहनतळांची निर्मिती केली आहे. परंतु, येथे वाहन ठेवणे महाग पडत असल्याची ओरड नागरिक करत आहेत. पश्चिमेला वैशाली थिएटर परिसरात खाजगी वाहनतळ असून तेथे नागरिक दुचाकी ठेवत आहेत. चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ नसल्याने देखील समस्या निर्माण झाली आहे.
वाहनतळ बांधून तयार पण दोन महिने ‘नो पार्किंग’
बदलापूर शहरात नागरिकांसोबत वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येवर पालिकेने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून यासाठी बदलापूर पूर्व व पश्चिम भागात बांधकाम व्यवसायिकांकडून समायोजित आरक्षणाच्या बदल्यात...
आणखी वाचा
First published on: 16-06-2015 at 12:42 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parking area is ready but still two months no parking