अडीच हजार वाहने उभी करण्याची व्यवस्था उभारणार; अॅपद्वारे वाहनतळाचे ठिकाण समजणार
आशीष धनगर, लोकसत्ता
डोंबिवली : अरुंद रस्ते, भरमसाट वाहने आणि अपुरे वाहनतळ यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या कल्याण, डोंबिवली या शहरांतील वाहनतळांचा प्रश्न नवीन वर्षांत सुटण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने एकूण अडीच हजार वाहने एका वेळी उभी करता येतील, इतके वाहनतळ शहरात विविध ठिकाणी निर्माण करण्याचे धोरण आखले असून हे वाहनतळ विशेष यंत्रणेद्वारे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोबाइल अॅपवरूनदेखील नजीकचे वाहनतळ आणि तेथे उपलब्ध असलेल्या जागेची माहिती मिळू शकणार आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसर, टिटवाळा मंदिर आणि खडकपाडा या ठिकाणी असलेल्या पार्किं गच्या ठिकाणी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अडीच हजार वाहने उभी राहतील अशी व्यवस्था केली जात आहे. या कामासाठी पाच लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. याद्वारे पार्किंग व्यवस्थेचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. या यंत्रणेद्वारे मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पार्किंगची ठिकाणे शोधणे, पार्किंगसाठी जागेची नोंद करणे आणि पार्किंगसाठीचे शुल्क अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
कल्याण स्थानकाच्या दिशेने रोज वाहन घेऊन येणाऱ्या चालकांची संख्या बरीच मोठी आहे. कल्याण- डोंबिवलीपासून काही अंतरावर असणाऱ्या टिटवाळा मंदिर परिसरात अनेक मोठी गृहसंकुले उभी राहिलेली आहेत. या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील जास्त आहे. खडकपाडा भागात नवे कल्याण उभे राहिलेले आहे. या परिसरात अगदी गांधारी पुलापर्यंत मोठी गृहसंकुले आहेत. या सर्व गदारोळात वाहनचालकांना मात्र पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. तर काही वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा वाहन उभे करून निघून जात असल्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होत असते. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हे काम सुरू करण्यात येणार असून मार्चपासून ही यंत्रणा सुरू होणार आहे. डोंबिवलीत वाढते नागरीकरण आणि अरुंद रस्ते यामुळे दिवसेंदिवस येथील पार्किंगचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. त्यामुळे पार्किंगसाठी आरक्षित असणाऱ्या भूखंडांवर या वर्षांत नवीन वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
यंत्रणा अशी
* या वाहनतळांच्या ठिकाणी स्वयंचलित फाटक, वाहने तपासणीसाठी स्कॅनर, सीसीटीव्ही कॅमेरे अशी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित असेल.
* मोबाइल अॅपच्या माध्यमातून वाहनतळाचे ठिकाण शोधणे सोपे जाईल. एवढेच नव्हे तर, पार्किंगसाठी जागेची आगाऊ नोंदणीही करता येईल.
* नोंद झाल्यानंतर पार्किंगच्या ठिकाणी असलेले स्कॅनरने वाहने संपूर्ण स्कॅन केली जातील. वाहन स्कॅन झाल्यावर स्वयंचलित फाटक आपोआप खुले होईल.
* त्यानंतर नोंद केलेल्या ठिकाणी वाहने उभी करता येणार आहेत. तसेच पार्किंगचे शुल्क अॅपद्वारे भरता येणार आहे.
कल्याण डोंबिवली शहरात सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांची आखणी करण्यात येत आहे. याच स्मार्ट सिटी योजनेत या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
– गोविंद बोडके, आयुक्त, कल्याण डोंबिवली महापालिका.