लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाण्यातील जांभळीनाका बाजारपेठेतील ८० ते ९० वर्ष जुन्या इमारतीचा भाग रविवारी कोसळला. ही इमारत रिकामी असल्याने दुर्घटना टळली. सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी इमारतीजवळ धोकापट्टी बांधली आहे.

आणखी वाचा-ठाण्यात मालिकांच्या चित्रीकरण बनावट परवानगीचे पत्र, पत्रावर पोलीस उपायुक्ताची बनावट स्वाक्षरी

जांभळीनाका येथील कडवा गल्ली परिसरात ८० ते ९० वर्ष जुनी अतिधोकादायक दुमजली इमारत आहे. या इमारत कोणीही वास्तव्यास नव्हते. रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास इमारतीचा जीर्ण झालेला भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती ठाणे महापालिकेला मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव पथकांनी येथे धोकापट्टी बांधली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Part of an 80 year old building in thane market collapsed mrj
Show comments