ठाणे : पुढील वर्षाच्या अर्थसंकल्प आखणीत नागरिकांना सहभागी करून घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमाच्या माध्यमातून आयुक्त अभिजीत बांगर हे थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांची शहराबद्दलची मते जाणून घेणार आहेत. नागरिकांच्या मताचा अंर्तभाव अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. यासाठी आधीच्या अर्थसंकल्पाचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच, शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जात आहे. एखादी समस्या असेल तर तिचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनास लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळते. माध्यमांचे प्रतिनिधीही वेळोवेळी बातम्यांमधून किंवा प्रत्यक्ष भेटून विविध मुद्दे निदर्शनास आणून देतात. यासोबतच नागरिकांची मते जाणून घेण्याची गरज असल्याने ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे.

Human life, High Court, compensation, mumbai,
तुटपुंजी भरपाई देण्याएवढा माणसाचा जीव स्वस्त नाही – उच्च न्यायालय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Proposal to set up a new super specialty hospital in Pune news
पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होणार! लवकरच नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
mumbai High Court urged bmc and State Government to declare they are unable to solve illegal hawkers issue
…तर असमर्थ असल्याचे तरी जाहीर करा ! बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवरून उच्च न्यायालयाचे महापालिका, सरकारला खडेबोल
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Dombivli illegal hoardings loksatta news
डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
Tax revenue is vital for civic services and property tax ensures
करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सूचना

हेही वाचा – शहरांच्या कचराभूमी धगधगत्याच, अंबरनाथ स्थानकाशेजारी कचरा पेटवण्याचे सत्र सुरूच

नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांमध्ये विविध गटांच्या माध्यमातून आयुक्त नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यात, डाॅक्टर, वकील, सनदी लेखापाल, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, महिला व बाल कल्याण या विभागांसाठी कार्यक्रमाची आखणी करताना त्यात अनुभव गाठीशी असलेल्या व्यावसायिकांचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोलाचा ठरू शकतो. तसेच, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय यांचे प्रश्न लक्षात घेवून त्यांचे प्राधान्यक्रम ठरविणे शक्य होते. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा नेहमीच उपयोगी ठरतात असेही बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – कल्याणमधील साडे चार हजार झाडांवर संक्रांत; २५ वर्ष राखलेल्या जंगलाची कत्तल होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध

ठाणे महापालिका क्षेत्रात झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्यांची लोकसंख्या अधिक आहे. या लोकवस्तीत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसोबत संवाद साधला जाणार आहे. शहरात नागरिकांशी संवाद साधताना काही सूचना, उपाय, बदल सुचविता येतील. शहराच्या जडणघडणीत त्यांना महापालिकेच्या माध्यमातून सहभागी होता येईल. शहराच्या जडणघडणीत योगदान असावे असे प्रत्येकाला वाटते. आता हे शहर मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने नागरिक म्हणून आपली जबाबदारीही वाढली आहे. आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, शिक्षण, रस्ते, परिवहन सेवा, याबद्दल नागरिक वेळोवेळी मते मांडतात. तसेच, सुधारणा दिसू लागली की कौतुकही करतात. कचरा टाकण्याची पारंपरिक ठिकाणे आता स्वच्छ राहू लागली आहेत. दिवसातून दोन वेळा रस्त्यांची सफाई होऊ लागली आहे. याबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद येतो आहे. या पार्श्वभूमीवर, ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमातून ठोस मुद्दे समोर येऊ शकतील. त्यातून चर्चा होऊन महापालिकेच्या कारभारात नागरिकांचा सहभाग वाढीस लागेल, असा विश्वास आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला आहे. या माध्यमातून नागरिकांकडून जे मुद्दे समोर येतील त्याचा अंतर्भाव अर्थसंकल्पात केला जाईल. तसेच, काही बाबींची उकल राज्य शासनाच्या माध्यमातून होणे आवश्यक असेल तर तसा प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader