छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सोमवारी रात्री सुटणाऱ्या हावड मेलमध्ये तीन फेरीवाल्यांनी संगनमत, दमदाटी करुन करुन झारखंडमधील एका प्रवाशाला लुटले. या प्रवाशाची गावी जाण्यासाठी जमवलेली अडीच हजार रुपयांची पैशाची पुंजी घेऊन फेरीवाले चोरटे फरार झाले.कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लुटीमुळे लोकल, एक्सप्रेसमधील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. लोकल, मेल एक्सप्रेसमधील काही फेरीवाले हे चोरीचे प्रकार करतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. उपनगरीय महिला प्रवासी रेल्वे महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी लोकल, मेल, एक्सप्रेसमधील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. तरीही रेल्वे अधिकारी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन रेल्वे प्रवासातील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा