लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर रात्रीच्या वेळेत एका २१ वर्षाच्या तरूणाला दोन अनोळखी तरूणांनी लुटले. चोरट्यांनी प्रवासी तरूणाजवळील पिशवी, मोबाईल असा एकूण सात हजाराहून अधिक रकमेचा ऐवज चोरून नेला आहे.
गेल्या महिन्यात हा प्रकार घडला होता. रविवारी याप्रकरणी तरूणाच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. मेहरान शाईस्ता मेमन (२१) असे तक्रारदार तरूणाचे नाव आहे. तो कौसा मुंब्रा भागात राहतो.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार मेहरान मेमन कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवरून फलाटाच्या दिशेने येत होते. ते मोबाईलवर बोलत होते. मेहरान चालत असताना त्याच्या पाठीमागून तो अनोळखी तरूण आले. त्यांनी मेहरान यांना काही कळण्याच्या आत हाताचा ठोसा त्याच्या डोक्यात मारला. अचानक घडलेल्या या प्रकाराने तक्रारदार घाबरला. मारहाण करणारे तरूण मेहरान याच्या जवळील पिशवीची मागणी करू लागले. त्याने पिशवी देण्यास नकार दिला.
मेहरान याने चोरट्यांना प्रतिकार करण्यास सुरूवात करताच, एका चोरट्याने स्वताच्या हातामधील स्टीलचा कडा काढून तो जोराने तक्रारदाराच्या डोक्यात मारला. मेहरानच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. रात्रीची वेळ असल्याने स्कायवॉकवरील प्रवाशांची वर्दळ कमी होती. त्यामुळे मेहरानच्या बचावासाठी कोणीही प्रवासी पुढे आले नाही. दोन्ही तरूणांनी आक्रमकपणे मेहरानला पकडून त्याच्या जवळील पिशवी हिसकावून घेतली. त्याचा मोबाईल, मनगटी घड्याळ काढून घेऊन पळ काढला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मेहरान रुग्णालयात उपचार घेत होता. ठीक झाल्यावर त्याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली.
आणखी वाचा-कल्याणमध्ये उमेदवारी न दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
गेल्या दोन वर्षापासून कल्याण रेल्वे स्थानक परिसर, राज्य परिवहन महामंडळाचा बस आगार भागात रात्री दहा वाजल्यानंतर प्रवासी, पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. कल्याण रेल्वे स्थानक भागात रात्रीच्या वेळेत गस्तीवर पोलीस असुनही भुरटे चोर पोलीस गस्तीच्या ठिकाणाहून गायब असल्याचे हे प्रकार करत आहेत. चोरट्यांच्या या टोळीमध्ये काही महिलांचाही सहभाग असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.