ठाणे : साध्या लोकल बंद करून वातानुकूलित गाडय़ा सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करतानाच आगामी काळात या मुद्दय़ावर मोठे आंदोलन उभे राहील, असा इशारा रविवारी कळवा येथे प्रवाशांच्या बैठकीत देण्यात आला. वातानुकूलित गाडय़ांविरोधात गेल्या काही दिवसांपासून कळवा, बदलापूर यांसारख्या रेल्वे स्थानकांमध्ये आंदोलन झाले. ते उत्स्फूर्त होते. आठ-दहा वातानुकूलित लोकल गाडय़ा बंद करून हा प्रश्न मिटला आहे, असा समज प्रशासनाने करून घेऊ नये. साधी लोकल देत नसाल तर रेल्वे रुळांवरून चालत जाऊ, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in