डोंबिवली : शिळफाटा कल्याण फाटा चौकात कल्याण-डोंबिवली, पुणे, ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक सेवक वाहने अडवून त्रास देत असल्याच्या वाढत्या तक्रारी प्रवासी करत आहेत. शिळफाटा चौकात वाहतूक पोलीस वाहतूक नियोजनापेक्षा वाहने अडवून त्यांना त्रास देण्यात सर्वाधिक आघाडीवर असल्याने वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

शिळफाटा चौकात पुणे, पनवेलकडून, नवी मुंबईकडून, ठाणे, मुंबईतून, कर्जत, बदलापूर, कल्याण-डोंबिवली, भिवंडीकडून येणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. दररोज हजारो वाहने शिळफाटा चौकातून येजा करतात. शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे प्रत्येक वाहन चालक या रस्त्यावरुन शिळफाटा चौकातून झटपट पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी आतुर असतो. अनेक कुटुंब सुट्टीच्या दिवशी, सलग सुट्ट्या आल्या की पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आपल्या खासगी वाहनांमधून फिरायला जातात.

Flight Attedent
Delta Airline : “योग्य अंतर्वस्त्रे परिधान करा”, फ्लाईट अटेंडंटना विमान कंपनीकडून तंबी!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
ST diesel buses will start in October mumbai news
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार
Central Railway decision to revise the charges of coolies Mumbai
मुंबई: हमालांच्या शुल्कात १० रुपयांनी वाढ
Bike rider accident on Ghodbunder road thane
अपघात होऊन अर्धा तास झाला, पण कोणीही मदतीला आले नाही; घोडबंदर मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात
action against vehicle owners
कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई
Crime of theft, employee Spice Jet Airlines,
स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा

हेही वाचा : डोंबिवलीतील सेवानिवृत्ताची ७७ लाखाची फसवणूक

जड, अवजड वाहनांची या रस्त्यावरुन येजा सुरू असते. या वाहनांना झटपट रस्ता मोकळा करुन देण्यापेक्षा कुटुंब असलेली, मुंबई परिसरातील मोटार वाहने असली की वाहतूक सेवक हमखास ही वाहने शिळफाटा चौकात रस्त्याच्या कोपऱ्याला अडवतात. वाहनाची कागदपत्रे मागवुन काहीतरी त्यात त्रृटी काढून प्रवाशांना खोळंबून ठेवतात. ही कारवाई सुरू असेपर्यंत एकही वाहतूक पोलीस तिकडे फिरकत नाही. वाहतूक पोलीस शिळफाटा चौकातील रस्त्यांच्या कोपऱ्यांना थव्याने उभे असतात. साहेब येईपर्यंत तुम्ही थांबून रहा, असे वाहतूक सेवक वाहनातील प्रवाशांना सांगतात. हेतुपुरस्सर वाहतूक अधिकारी किंवा पोलीस रखडून ठेवलेल्या वाहनाजवळ उशिराने येऊन प्रवाशांना त्रस्त करतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

दहीसर मोरीजवळ हनुमान ढाबा, कल्याण शिळफाटा चौक कोपऱ्यांवर वाहतूक पोलीस थव्याने उभे असतात. त्यांच्या आजुबाजुला रखडून ठेवलेली वाहने असतात. या वाहनांच्या मागे अनेक वेळा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. हे प्रकार अलीकडे खूप वाढल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. कोणी वाहन चालकाने वाहतूक पोलीस किंवा सेवकाला जाब विचारला तर त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार करण्याची तयारी वाहतूक पोलीस करतात, असे प्रवाशांनी सांगितले.

हेही वाचा : कल्याणमध्ये आडिवलीतील नैसर्गिक स्त्रोत बुजविणारी बेकायदा इमारत भुईसपाट

शिळफाटा चौकात वाहतूक सेवक आणि पोलिसांची मनमानी सुरू आहे, त्याची गंभीर दखल वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. शिळफाटा चौकातील कोपऱ्यावर वाहने अडवून दररोज दौलतजादा होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. अधिक माहितीसाठी वाहतूक विभागाचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मोबाईलचा अतिवापर

शिळफाटा चौकात वाहतूक नियोजन करताना अनेक वेळा वाहतूक सेवक, पोलीस मोबाईलवर बोलत असतात किंवा मोबाईल मधील खेळात दंग असल्याचे प्रवाशांनी सांगितले. अनेक वेळा या पोलिसांच्या समोरुन विरुध्द मार्गिकेतून एखादा वाहन चालक निघून जातो तरी वाहतूक पोलीस मोबाईलमध्ये दंग असल्याने त्यांना घडलेला प्रकार दिसत नाही.