डोंबिवली : दिवा रेल्वे स्थानकात सीएसएमटीकडे जाणाऱ्या काही जलद लोकल्सना सकाळच्या वेळेत थांबा आहे. या लोकल कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवाशांनी तुडुंब भरून येतात. दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना या जलद लोकलमध्ये चढता येत नाही. दिवा रेल्वे स्थानकातील अनेक प्रवासी रेल्वे मार्गात उभे राहून फलाटाच्या विरुध्द दिशेने जलद लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. या जीवघेण्या प्रवासाबद्दल इतर प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवा रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेत मुंबईला जाणाऱ्या सर्व लोकल्स प्रवाशांनी खच्चून भरून जातात. प्रत्येक प्रवाशाची वेळेत कार्यालयात, कामाच्या ठिकाणी पोहचण्याची घाई असते. त्यामुळे बहुतांशी प्रवासी जलद लोकने मुंबईत पोहचण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकात टिटवाळा, कल्याण, कसारा, कर्जत, बदलापूर भागातून येणाऱ्या जलद लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. या लोकल कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर, उल्हासनगर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी खच्चून भरल्या जातात. या लोकल्सच्या दरवाजामध्ये प्रवाशांची अभेद्य भिंत असते. ती तोडून दिवा रेल्वे स्थानकातील फलाटावरील प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही.

हेही वाचा…घोडबंदर भागातील पाणी पुरवठ्यासाठी टँकरचे नियोजन, जानेवारी ते मे महिन्यासाठी पालिका घेणार टँकर भाड्याने

या लोकलना दिवा रेल्वे स्थानकात थांबा असला तरी प्रवाशांना या खच्चून भरलेल्या लोकलमध्ये चढता येत नाही. असे बहुतांशी पुरूष प्रवासी लोकल येण्यापूर्वी रेल्वे मार्गात उतरतात. लोकलच्या फलाटाच्या विरुध्द बाजूकडील दरवाजातून रेल्वे मार्गात उभे राहून चढण्याचा प्रयत्न करतात. विरुध्द बाजूकडील दरवाजातही हे प्रवासी लोंबकळत प्रवास करत असतात. अगोदरच दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांना दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. या डब्यात चढून दिले नाहीतर तर ते दादागिरी करतात, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.

सकाळच्या वेळेत दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात असतात. पण काही वेळ ते फलाटावरून बाजुला गेले की फलाटावरील प्रवासी रेल्वे मार्गात उतरून विरुध्द बाजुने लोकल डब्यात चढतात, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या. विरुध्द बाजुने चढणाऱ्या प्रवाशाला थेट डब्यात प्रवेश मिळत नाही. तो प्रवासी दरवाजात लोंबकळत प्रवास करतो. दिवा रेल्वे स्थानक लोकलने सोडल्यावर मुंब्रा दिशेने जाताना लोकलने वेग घेतला की लोकल अति वेगाने हेलकावे घेते. या भागात रेल्वे रुळालगत वीज वाहक तारांचे खांब आहेत. अनेक वेळा प्रवाशावर डब्यातील प्रवाशांचा दरवाजातील प्रवाशावर भार येऊन लोंबकळत असलेला प्रवासी रेल्वे मार्गात पडतो किंवा काही वेळा खांबाचा फटका बसून तो रेल्वे मार्गात पडतो, अशी माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली.

हेही वाचा…घरगुती खानावळ, पोळी भाजी केंद्र दुहेरी आर्थिक कोंडीत, भाज्यांचे वाढत्या दरामुळे खर्चात वाढ

दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा हा धोकादायक प्रवास टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा जवानांनी सकाळच्या वेळेत फलाट परिसरातील गस्त कायम ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहेत.