लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदणीकरणाचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. या कामासाठी मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे सेवा रद्द झाल्या आहेत. तर काही रेल्वे सेवा सकाळपासून उशिराने धावत आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवर बसला असून प्रवाशांचे हाल होत आहे. काही प्रवाशांनी रस्ते मार्गाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता परंतु मुंबई नाशिक महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने रस्ते मार्गावरही प्रवाशांची कोंडी झाल्याचे चित्र होते.
ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाख प्रवासी प्रवास करतात. सर्वाधिक प्रवास हा पाच आणि सहा या लोकलच्या जलद फलटावरून होत असतो. फलाटांवर खाद्याचे स्टॉल, पादचारी पूल, सरकते जीने असल्याने गर्दीच्या वेळेत फलाटावर उभे राहण्यासाठी शक्य होत नव्हते. त्यामुळे सुमारे वर्षभरापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचा निर्णय हाती घेतला l होता. विविध तांत्रिक कारणांमुळे विविध तांत्रिक हे काम रखडले होते अखेर मध्यरात्री पासून या कामास सुरुवात झाली आहे. असे असले तरी प्रवाशांना पुरेशी कल्पना नव्हती. अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. बहुतांश रेल्वेगाड्या सकाळपासून उशिराने धावत आहे. त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागला.
ज्या प्रवाशाना मेगाब्लॉक बद्दल माहिती होती त्यांनी घरातूनच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गर्दीमध्ये थोडीफार घट झाल्याचे चित्र होते. तसेच सकाळी फलट क्रमांक चार येथून रेल्वे गाड्यांची सेवा सुरू झाली होते. त्यामुळे सकाळी फलाट क्रमांक सहावर होणारी गर्दी फलाट क्रमांक चारवर विखुरली गेली. पूर्व दृष्ट गती महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचा भार वाढल्याने रस्ते मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाले होती.