डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिन्यावर फलाट क्रमांक पाचवर उतरण्याच्या भागात लाद्या तुटल्या आहेत. या तुटलेल्या लाद्या भागातून घाई घाईत जाताना प्रवाशांचा पाय घसरणे, मुरगळण्याचे प्रकार वाढले आहेत. एखादा प्रवासी लोकल पकडण्यासाठी धावत असेल तर तो या तुटलेल्या लाद्यांच्या भागात पाय घसरुन पडत आहे.

तुटलेल्या लाद्यांचा सर्वाधिक फटका मोबाईलमध्ये पाहत चालणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. जिन्यावरुन चालताना तुटलेल्या लाद्यांच्या भागात पाऊल टाकले की समतल भागातून थेट खड्ड्यात पाय पडतो. त्यामुळे तोल जाऊन प्रवासी जागेवरच कोसळतो. काही प्रवाशांचे पाय मुरगळतात. सकाळच्या वेळेत या भागात पाय घसरुन पडणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक आहे. अर्धा तासाच्या अंतरात या तुटलेल्या लाद्यांच्या भागात १० हून अधिक प्रवाशांना आचका बसतो.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Metro fight between two women abuses each other in delhi metro viral video on social media
आधी मेट्रोतून बाहेर ढकललं मग केली शिवीगाळ, महिलांमधलं भांडण इतकं टोकाला गेलं की…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात
train accident mock drill video fact check
दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या! रेल्वेचा एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर चढला, अनेक प्रवासी गंभीर जखमी? अपघाताच्या घटनेचा थरारक Video? वाचा, सत्य घटना
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Jaipur railway track incident thar stuck in drunken misadventure shocking video goes viral
VIDEO: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली थार; तितक्यात पाठीमागून मालगाडी आली अन्…थरारक शेवट

हेही वाचा: एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून कल्याण मधील महिलेची फसवणूक

डोंबिवली रेल्वे स्थानकात दररोज सकाळ, संध्याकाळ सफाई कामगारांकडून सफाई केली जाते. व्यवस्थापक स्थानकावर फेरफटका मारतात. रेल्वे पोलीस तुटलेल्या लाद्यांच्या भागात प्रवासी पडताना बघतात. त्यामुळे या भागात नवीन लाद्या आणून बसवाव्यात असे स्थानक यंत्रणेला का वाटत नाही. दहा लाद्यांमध्ये तुटलेला भाग समतल होणार आहे. अनेक महिन्यांपासून या तुटलेल्या लाद्यांकडे पाहत रेल्वे यंत्रणा गुपचिळी धरुन बसली आहे. एखाद्या प्रवाशाचा याठिकाणी पाय मुरगळून मोठी दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेकडून उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा: अंबरनाथः वालधुनी नदीवर फेसाळ थर; रासायनिक सांडपाण्यामुळे फेस आल्याचा संशय

तुटलेल्या लाद्या भागात नवीन लाद्या बसवाव्यात किंवा तेथे सिमेंटचा गिलावा टाकण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दररोज १० ते १५ प्रवाशांना तुटलेल्या लाद्यांचा फटका बसत आहे. हे प्रवासी लंगडत जाऊन लोकल पकडत आहेत, असे प्रत्यदर्शीने सांगितले.