रंगवलेल्या भिंतींवर पानाच्या पिचकाऱ्या, खाद्यान्नाची रिकामी पाकिटे

ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी महापालिका एकीकडे शहरातील इमारतींना समान रंगसंगती आणण्याची मोहीम राबवत असताना ठाणे रेल्वे स्थानकातील भिंती विविध चित्रांनी रंगवून स्थानकाचा कायापालट करण्याच्या सामाजिक संस्था व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना प्रवाशांकडूनच हरताळ फासण्यात येत आहे. रंगवलेल्या भिंतींवर पानाच्या पिचकाऱ्या, स्वच्छ फलाटांवर खाद्यान्नाची रिकामी पाकिटे, कचरा टाकणे असे प्रकार प्रवाशांकडून होत असल्याने स्वच्छतेच्या मूळ संकल्पनेलाच धक्का बसत आहे.

[jwplayer PuSvtqP8]

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. हे स्थानक स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी येथील भिंतींवर काही महिन्यांपूर्वी विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रंगकाम केले होते. तसेच भित्तिचित्रे काढून स्थानक सुशोभित करण्याचा प्रयत्नही केला होता. असे असताना या सुशोभित भिंतींवर प्रवाशांनी पानाच्या भागातील भिंतींची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत २० ते २५ भिंतींची निवड करण्यात आली आहे. या भिंतींवर त्यात्या प्रभागातील स्थानिक नागरिक, शाळांमधील विद्यार्थ्यांना आपल्या कलांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. भिंती रंगविण्याच्या माध्यमातून शहरात स्वच्छतेची एक चळवळ उभी राहावी असा महापालिकेचा प्रयत्न असून यामध्ये ठाणेकर रहिवाशांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी जयस्वाल यांनी केले. या रंगकामासाठी प्रयोजकांच्या माध्यमातून आवश्यक रंग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरू असले तरी शिक्षण संस्था तसेच नागरिकांनी स्वखर्चाने यासाठी पुढाकार घेतल्यास भिंती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची राहील, असेही ते म्हणाले. दरम्यान, राजकीय, धार्मिक, राष्ट्रीय ध्वज यांच्याशी संबंधित तसेच तणाव निर्माण करणाऱ्या विषयांना या संकल्पनेत प्रतिबंध करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

[jwplayer y8Pn2zMM]

Story img Loader