फलाटावरील एका प्रवाशाचे प्रसंगावधान आणि धाडस यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात भरधाव लोकलखाली येत असलेल्या एका पाच वर्षांच्या चिमुरडय़ाचे प्राण वाचले. रविवारी दुपारी चार वाजता घडलेल्या या घटनेचा थरार सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कुर्ला येथून आलेल्या या चिमुरडय़ाची आई फलाट क्रमांक दोनवरून फलाट तीनवर गेली होती. मात्र हा मुलगा फलाट क्रमांक दोनवरच तिला शोधत होता. आपली आई फलाट तीनवर असल्याचे समजताच तो फलाटावरून खाली उतरून रेल्वे रूळ ओलांडू लागला. याच वेळेस कर्जतहून मुंबईला जाणारी भरधाव लोकल या रुळावरून वेगाने येत होती. मात्र फलाटाची उंची जास्त असल्याने त्याला फलाटावर चढता आले नाही. हा चिमुरडा लोकलच्या खाली सापडेल असे वाटत असतानाच एका प्रवाशाने त्याला ओढून वर घेत त्याला वाचवले आणि त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला.

Story img Loader