डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बापूसाहेब फडके रस्त्यावर दररोज संध्याकाळी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. अनेक वाहन चालक फडके रोडवर वाहने उभी करून खरेदीसाठी बाजीप्रभू चौक, नेहरू रोड भागात खरेदीसाठी जातात. फडके रोड हा एक दिशा मार्ग असताना उलट दिशेने या रस्त्यावरून वाहने धावतात. त्यामुळे दिवसेंदिवस दररोज संध्याकाळच्या वेळेत या रस्त्यावर वाहन कोंडी होते.

बापूसाहेब फडके रस्त्यावर जवाहिर, गृहपयोगी वस्तू, वस्त्रप्रावरणे अशी विविध प्रकारची दुकाने आहेत. हाॅटेल्स या रस्त्यावर आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने दुकानासमोर उभी करून ठेवतात. या जागेत अगोदरच दुकान मालकांची वाहने उभी असतात. हाॅटेल्ससमोर घरपोच खाद्यपदार्थ पुरवठादार वितरकांची दुचाकी वाहने घोळक्याने उभी असतात.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात

हेही वाचा – शहापूरमध्ये बिबट्याचा वावर असलेल्या संवेदनशील गावांमध्ये सौरकुंपण, शहापूर वनविभागाचा पथदर्शी प्रकल्प

फडके रोड गणपती मंदिर, टिळक रस्त्याने येऊन डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुला आहे. या एक दिशा मार्गावर रेल्वे स्थानकाकडून येणारी रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने घुसखोरी करतात. या रस्त्यावर कोंडी करतात. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर फडके रोडवर नवी मुंबई, ठाणे परिसरातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी वाहने येतात. केडीएमटीच्या बस याच रस्त्यावरून धावतात. या रस्त्याच्या दुतर्फा फळ, भाजीविक्रेते बसलेले असतात. पदपथांवर दुकानदारांनी आपल्या वस्तू ठेऊन पदपथ अडविलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना फडके रस्त्यावरून चालताना वाट काढत जावे लागते.

संध्याकाळच्या वेळेत नोकरदार वर्ग घरी परतत असतो. त्यांनाही या कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकाकडून, के. बी. वीरा शाळेकडून येणारे बहुतांशी वाहन चालक फडके रोडवरील एक दिशा मार्गिकेचे उल्लंघन करून वाहने चालवितात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. नेहरू रस्ता, के. बी. वीरा शाळा आणि बाजीप्रभू चौकाकडून गणेश मंदिराकडे जाणारी उलट दिशेची वाहने रोखण्यासाठी वाहतूक विभागाने फडके रस्त्यावर अंबिका हाॅटेल भागात संध्याकाळच्या वेळेत एक वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिक, व्यापारी करत आहेत.

केडीएमटीच्या बस संध्याकाळी टिळक रस्त्याने फडके रस्त्यावरून बाजीप्रभू चौक भागात जातात. मदन ठाकरे चौकात या बसना वळण घेताना रस्त्यावरील दुचाकी, फेरीवाल्यांचा अडथळा येतो. अनेक वेळा बस या चौकात अडकून पडतात. वाहतूक विभागाची टोईंग व्हॅन नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे. वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले, डोंबिवली शहरात वाहन कोंडी होणार नाही अशा पद्धतीने नियोजन केले आहे. रस्त्यावर नियमबाह्य उभी केलेली वाहने टोईंग व्हॅनच्या माध्यमातून उचलली जातात. फडके रोडवरील वाहनांनावर नियमित कारवाई केली जाते.

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिकेतील ‘टीटीएल’ अत्याधुनिक अग्निशामन वाहन दुरुस्तीची फाईल लालफितीत, वाहन दुरुस्ती अभावी अडगळीत

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू आहे. पादचाऱ्यांना रस्ते, पदपथ मोकळे राहतील यादृष्टीने फेरीवाले नियंत्रण पथक कारवाई करते. फडके रोडवर पालिका आणि वाहतूक विभागाची संयुक्त मोहीम राबविण्याचा विचार आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.

Story img Loader