लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पाटकर रस्त्यावर रिक्षा वाहनतळा शेजारील रस्त्यावरील पेव्हर ब्लाॅक निघून रस्ता खचला आहे. सकाळ, संध्याकाळ घाईत असलेले प्रवासी या खड्ड्यात पडून जखमी होत आहेत.

पाटकर रस्त्यावरील रिक्षा वाहनतळाजवळ हा खड्डा आहे. प्रवाशांची रिक्षेत बसण्यासाठी, उतरण्यासाठी या भागात वर्दळ असते. पाऊस सुरू असला की हा खड्डा पाण्याने भरतो. अनेकांना या खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने ते या खड्ड्यात पडून जखमी होतात. लोकल पकडण्यासाठी घाईत असलेला प्रवासी रेल्वे स्थानकाकडे पाहत धावत असतो. तोही दररोज या खड्ड्यात पडत असल्याचे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा… डोंबिवलीत अत्याधुनिक तंत्रज्ञानातून काँक्रीटचा रस्ता, पेंढरकर कॉलेज ते घरडा सर्कल रस्त्याची बांधणी

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर जुन्या अनुकुल हाॅटेलच्या शेजारी पाटकर रस्त्यावर हा खड्डा पडला आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील पेव्हर ब्लाॅक निघून तेथे खड्डा पडला आहे. हे या भागात फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या फेरीवाला हटाव पथकातील कामगारांना दिसते. तेही या खड्ड्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना देत नाहीत. काही पादचाऱ्यांनी पालिकेत जाऊन या खचलेल्या रस्त्याच्या तक्रारी केल्या आहेत.

हेही वाचा… कल्याण-डोंबिवलीत खड्डे भरणीच्या कामांना वेग

प्रत्येक विभागासाठी पालिकेने खड्डे भरणीसाठी ठेकेदार नेमले आहेत. पाटकर रस्ता भागात नेमणूक असलेल्या ठेकेदाराला खचलेला रस्ता दिसत नाही का, असे प्रश्न प्रवासी करत आहेत. हा खचलेला रस्ता तातडीने भरण्यात यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. या खड्ड्यात पडून कोणा प्रसिध्द व्यक्तिचा पाय मुरगळेल तेव्हा पालिका हा खचलेला रस्ता सुस्थितीत करणार का, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.