अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून पनवेल, वसई-विरार भागात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. हे प्रवासी ठाणे, कल्याण दिशेने तळ कोपर रेल्वे स्थानकात येऊन तेथून अप्पर कोपर रेल्व स्थानकात जाऊन तेथून इच्छित स्थळी प्रवास करतात. तळ आणि अप्पर कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यानचा जुना जीना वाढत्या प्रवासी संख्येला अपुरा पडत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने या स्थानकात नवीन पादचारी पूल उभारणीचे काम सुरू केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुना पादचारी पूल जुना आणि अरुंद आहे. या पुलाची नियमित देखभाल करुन त्याचा वापर आतापर्यंत केला जात होता. आता वाढत्या प्रवासी संख्येमुळे जुना अरुंद पूल अपुरा पडू लागला आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत अनेक वेळा अप्पर कोपर स्थानकातून तळ कोपर रेल्वे स्थानकात येण्यासाठी प्रवाशांना पाच ते दहा मिनीट उशीर लागतो. अनेक प्रवासी मधला मार्ग म्हणून फलाटावरुन रेल्वे मार्गातून झुडपांमधून अप्पर, तळ कोपर रेल्वे स्थानकात येजा करतात. हा मार्ग धोकादायक असल्याचे माहिती असुनही झटपट प्रवासासाठी प्रवासी जीव धोक्यात घालून हा प्रवास करतात.

हेही वाचा:‘ठाण्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ; २७१ संशयित रुग्णांमध्ये ३७ रुग्ण गोवर रुबेला बाधीत

कर्जत, कसारा, कल्याण, ठाणे, डोंबिवली परिसरातील नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक दादर येथून वसई, डहाणू, वापी गुजरात येथे जाण्यापेक्षा डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकात येऊन अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून पनवेल, वसई-विरार भागात जाणे पसंत करतात. या प्रवाशांना दिवा, पनवेल येथून येणाऱ्या आणि बोईसर, वसई-विरार कडून येणाऱ्या पॅसेंजर सोयीच्या असतात. अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून एक तासात प्रवासी वसई कडे जातो. हाच प्रवास दादर मार्गे केला तर एक ते दोन तास लागतात, असे प्रवाशांनी सांगितले.भिवंडी जवळील कामण, खारबाव, गोवण परिसरात नवीन उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. विविध प्रकारची गोदामे याठिकाणी उभी राहिली आहेत. या भागात काम करणारा बहुतांशी कर्मचारी वर्ग कल्याण, टिटवाळा, बदलापूर परिसरातून येतो. हा प्रवासी नियमित पॅसेंजरने प्रवास करतो.

हेही वाचा:‘टिटवाळा स्थानकात ‘रेल रोको’, सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा विलंबाने

अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील गर्दी वाढत असल्याचे अहवाल स्थानिक स्थानक व्यवस्थापकांनी वेळोवेळी मध्य रेल्वेच्या वरिष्ठांकडे दिले आहेत. त्याची दखल घेऊन रेल्वेच्या तांत्रिक अभियंत्यांनी पाहणी करुन कोपर रेल्वे स्थानकात तळ आणि अप्पर कोपर स्थानकांच्या दरम्यान पूल उभारणीचे काम सुरू केले आहे. नवीन पूल विस्तारित आणि थेट अप्पर, तळ कोपर स्थानकाला जोडणारा असेल, असे रेल्वेच्या अभियंत्याने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pedestrian bridge will be constructed between tal kopar to upper kopar railway station thane news tmb 01