मोबाईल वर बोलत रस्त्याने पायी जात असताना दोन भुरट्या चोरांनी बुधवारी रात्री साडे नऊ वाजता एका तरुणाचा मोबाईल झटक्यात हिसकावून पळ काढला. तरुणाने या दोन्ही भुरट्यांचा चोर चोर करत पाठलाग केला. या तरुणाला साथ देत इतर पादचारी चोरांना पकडण्यासाठी धावू लागले. शिळफाटा रस्त्यावरील सेवा रस्त्यावर चोरट्यांना पकडण्यात पादचाऱ्यांना यश आले.

डोंबिवली पूर्वेतील सोनारपाडा येथून हा थरार सुरू झाला होता. या दोन्ही मोबाईल चोरट्यांना पकडताच नागरिकांनी त्या दोघांना बेदम चोप दिला. त्यांना मानपाडा पोलिसांच्या हवाली केले. विशाल हर्षद ठक्कर (२२, रा. निळकंठ पार्क, वीटभट्टी जवळ, आडिवली, कल्याण पूर्व), सचीन मोहनलाल राय (२०, सिध्दीविनायक चाळ, चेतन शाळे जवळ, मलंग रस्ता, कल्याण पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

पोलिसांनी सांगितले, हितेश विश्वास पाटील हा तरुण नोकरी करतो. तो सोनारपाडा येथे राहतो. हितेश बुधवारी रात्री साडे नऊ वाजता कामावर जाण्यासाठी पायी मानपाडा चौकाकडे निघाला होता. तो चालताना मोबाईलवर बोलत होता. शिळफाटा रस्त्यावरुन जात असताना काही भागात अंधार होता. या संधीचा गैरफायदा घेत आरोपी विशाल, सचीन यांनी हितेशला एकटाच पाहून त्याचा मोबाईल चोरीचा बेत आखला. आपण रस्त्याने चालतोय असे दाखवून दोघेही हितेशच्या दिशेेने गेले. त्यांनी हितेशला काही कळण्याच्या आत त्याच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळ काढला. हितेशने विनाविलंब चोर चोर ओरडत त्यांचा पाठलाग सुरू केला. इतर पादचारी चोरांना पकडण्यासाठी धावू लागले. अखेर शिळफाटा रस्त्यावर नागरिकांनी दोन्ही आरोपींना पकडले. त्यांच्याकडील चोरीचा मोबाईल हस्तगत केला. दोघांनी बेदम प्रसाद देत त्यांची रवानगी मानपाडा पोलीस ठाण्यात केली.मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.