ठाणे : ठाण्यात व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. नितीन मोरेलू (५२) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पाच किलो ४८ ग्रॅम वजनाची उलटी जप्त केली आहे. ही व्हेल माशाची उलटी पाच कोटी रुपयांची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठाण्यातील साकेत रोड परिसरात एकजण व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पोलिसांनी साकेत रोड परिसरात सापळा रचला. त्यावेळी एक व्यक्ती पायी जात होता. त्याच्या हातामध्ये पिशवी होती. त्याची वागणूक संशयास्पद असल्याने सापळा रचलेल्या पोलीस पथकांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे व्हेल माशाच्या उलटीचे तुकडे आढळून आले. त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव नितीन मोरेलू असून तो पुणे येथील दिघी भागातून आल्याचे समोर आले.

हेही वाचा…दोन हेल्मेट कसे सांभाळावे याची चिंता मिटली…आता चक्क हेल्मेटची घडी घालून….

पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. ही व्हेल माशाची उलटी पाच किलो ४८ ग्रॅम वजनाची आहे. त्याने नाशिक येथून एका व्यक्तीकडून ही व्हेल माशाची उलटी आणली होती. तसेच तो ८० लाख रुपयांना ही व्हेल माशाची उलटी विक्री करणार होता. या पदार्थांचा वापर सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी होतो अशी माहिती सुत्रांनी दिली.

Story img Loader